गुजरातचा एकमेव ग्रेट इंडियन बस्टर्ड पाकिस्तानात गेल्याचा अंदाज ; प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 07:44 AM2019-06-21T07:44:47+5:302019-06-21T08:04:54+5:30

पुणे : भारतात संख्येने अत्यंत कमी उरलेले पक्षी अर्थात ग्रेट इंडियन बस्टर्ड (माळढोक) ही प्रजात गुजरातमधून नामशेष होण्याची भीती पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा पक्षी गुजरातमधून उडून राजस्थान राज्यात किंवा सीमा पार करून पाकिस्तानात गेल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Gujarat's last single male Great Indian Bustard may crossed loc and reached in Pakistan | गुजरातचा एकमेव ग्रेट इंडियन बस्टर्ड पाकिस्तानात गेल्याचा अंदाज ; प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर

गुजरातचा एकमेव ग्रेट इंडियन बस्टर्ड पाकिस्तानात गेल्याचा अंदाज ; प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर

Next
ठळक मुद्देएकमेव ग्रेट इंडियन बस्टर्ड पाकिस्तानात गेल्याचा तज्ज्ञांचा अंदाजगुजरातमधून जात नामशेष होण्याची भीती 

पुणे : भारतात संख्येने अत्यंत कमी उरलेले पक्षी अर्थात ग्रेट इंडियन बस्टर्ड (माळढोक) ही प्रजात गुजरातमधून नामशेष होण्याची भीती पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा पक्षी गुजरातमधून उडून राजस्थान राज्यात किंवा सीमा पार करून पाकिस्तानात गेल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यमुळे सहा मादी पक्षिणींसोबत असलेला एकमेव नर जातीचा हा पक्षीच गायब झाल्याने ही पक्षांची जातच गुजरातमधून नामशेष होते की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

ग्रेट इंडियन बस्टर्ड मोठे, उभे शरीर, उंच पाय यामुळे हा पक्षी शहामृगासारखा दिसतो. उडणाऱ्या पक्ष्यांमधील सर्वांत जड पक्ष्यांपैकी हा एक आहे. भारतातील कोरड्या माळरानांवर एकेकाळी सहज दिसणाऱ्या ह्या पक्ष्यांची संख्या गेल्या वर्षांमध्ये वेगाने घटते आहे. मोठे, उभे शरीर, उंच पाय यामुळे हा पक्षी शहामृगासारखा दिसतो. उडणाऱ्या पक्ष्यांमधील सर्वांत जड पक्ष्यांपैकी हा एक आहे. भारतातील कोरड्या माळरानांवर एकेकाळी सहज दिसणाऱ्या ह्या पक्ष्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने घटते आहे. देशातल्या महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यात हा पक्षी आढळतो. 

गुजरातमध्ये असलेल्या पक्षांमध्ये सहा मादी तर केवळ एक नर पक्षी होता. त्यातही हा नर पक्षी प्रजननासाठी मोठा झाला की नाही याची चाचणी यंदा घेण्यात येणार होती. मात्र त्यापूर्वीच पक्षी गायब झाल्याची माहिती मिळत आहे. साधारण डिसेंबर २०१८नंतर हा पक्षी आढळून आलेला नाही. जुलैमध्ये या पक्षांना प्रजननासाठी अनुकूल स्थिती असते. मात्र त्यापूर्वी पक्षी परत न आल्यास पक्षांची संख्या अधिक घटू शकते. यासंबंधी कच्छ (पश्चिम विभागाचे) उप वनसंरक्षक बी. जे. अन्सारी यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 'हा  नर पक्षी सुरुवातीला राजस्थानला आणि तिथून शेजारील देश पाकिस्तानमध्ये गेला असावा. मागील वर्षापर्यंत हा पक्षी प्रजननासाठी क्षमतेने तयार नव्हता. मात्र यंदा तो प्रजननक्षम झाल्याचा तज्ज्ञांचा दावा होता'.

पाकिस्तानमध्ये होते अवैध शिकार   

पाकिस्तानमध्ये पक्षांची मोठ्या प्रमाणावर अवैध शिकार केली जाते. आंतराराष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन करणाऱ्या संघाने २०१७साली दिलेल्या अहवालानुसार पाकिस्तानात आजही मोठ्या प्रमाणावर अवैध शिकार होते. गेल्या चार वर्षांमध्ये तिथे गेलेल्या ६३ पैकी ४९ पक्षांची शिकार झाल्याचे आढळून आले आहे. 

गुजरात राजस्थानकडून घेणार मदत  

जर गुजरातमध्ये पक्षांची संख्या वाढवायची असेल तर राजस्थानाकडून नर पक्षाची मागणी केली जाणार आहे. इतकेच नव्हे तर कच्छमध्ये या पक्षांच्या संख्यावाढीसाठी विशेष केंद्र उभारण्यात येणार असून त्याकरिता दोन ननर पक्षांची मागणी केली जाणार असल्याचे समजते. याकरिता अबुदाबी प्रशासनाची मदत घेण्याचा विचारही गुजरात वन विभाग करत आहे. 

Web Title: Gujarat's last single male Great Indian Bustard may crossed loc and reached in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.