राज्यपालांनी चिमुकल्याच्या गळ्यात टाकला हार अन् माता झाली भावूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 10:58 AM2019-12-27T10:58:03+5:302019-12-27T10:59:55+5:30

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतले पांडूरंगाचे दर्शन

The Governor threw a necklace in the neck and the mother became emotional | राज्यपालांनी चिमुकल्याच्या गळ्यात टाकला हार अन् माता झाली भावूक

राज्यपालांनी चिमुकल्याच्या गळ्यात टाकला हार अन् माता झाली भावूक

googlenewsNext
ठळक मुद्दे- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज सोलापूर दौºयावर- सोलापूर विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभासाठी राज्यपाल आज सोलापुरात- पांडूरंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

पंढरपूर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गाडी तून विठ्ठल मंदिराच्या बाहेर उतरताच मंदिराजवळील एका पुजाराने त्यांच्या गळ्यामध्ये  तुळशीचा हार त्यांच्या गळ्यामध्ये घातला. अन् काही क्षणातच तो हार राज्यपालांनी बघ्यांच्या गर्दीत थांबलेल्या एका चिमुकल्याच्या गळ्यात टाकला. आणि हे पाहून चिमुकल्याची माता भावूक झाली.

श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे शुक्रवारी विठ्ठलाच्या दर्शनासाठी सकाळी नऊ वाजता येणार होते. यामुळे मंदिर परिसरात व राज्यपाल येणाºया मार्गावर पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता.  तरीही मंदिर परिसरात व रस्त्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यांना पाहण्यासाठी सर्वांनी गर्दी केली.

भांडुप (मुंबई) येथील कल्याणी भालचंद्र पाटील या त्यांच्या अडीच वर्षाच्या मुलांसह राज्यपाल यांना पाहण्यासाठी मंदिराजवळ थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या शेजारी त्यांच्या कुटुंबातील २८ जण देखील उभे होते. तसेच आजूबाजूचे नागरिक व भाविक देखील त्या ठिकाणी उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गाडी तून विठ्ठल मंदिराच्या बाहेर उतरताच मंदिराजवळील एका पुजाराने त्यांच्या गळ्यामध्ये विठ्ठलाचा अर्पण करण्यासाठी प्रसिद्ध असलेला तुळशीचा हार वंश भालचंद्र पाटील गळ्यामध्ये घातला.  यामुळे वंशाची आई कल्याणी पाटील या तर भावूक झाल्याच त्याचबरोबर त्यांच्या बरोबर असणारे कुटुंबातील इतर लोकही भावुक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.


 

Web Title: The Governor threw a necklace in the neck and the mother became emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.