हे सरकार फार काळ टिकणार नाही - फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 03:57 AM2020-01-03T03:57:21+5:302020-01-03T03:57:33+5:30

जनादेशाच्या पाठित खंजीर खुपसणारे हे सरकार फार काळ चालणार नाही. देशाचा इतिहास हेच सांगतो, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

This government will not last long - Fadnavis | हे सरकार फार काळ टिकणार नाही - फडणवीस

हे सरकार फार काळ टिकणार नाही - फडणवीस

Next

नागपूर : केवळ सत्तेचा माल खाण्यासाठी आणि भाजपला दूर ठेवण्यासाठी विश्वासघात आणि बेईमानी करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. जनादेशाच्या पाठित खंजीर खुपसणारे हे सरकार फार काळ चालणार नाही. देशाचा इतिहास हेच सांगतो, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर जिल्ह्यातील आमडी फाटा आणि धानला येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, निवडणूक काळामध्ये अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना करीत होती तर ५० हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी करीत होती. पण आता शेतकऱ्यांना कोणतीही मदत देण्यास सपशेल नकार हे सरकार देत आहे. राज्यात आपण काळजीवाहू मुख्यमंत्री असताना १० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी मंजूर केले होते. आज शेतकºयांची मोठी फसवणूक होते आहे. गुरुवारी पुन्हा नागपूर आणि परिसरात गारपीट झाली आहे. त्यांनाही मदत दिली पाहिजे. एकिकडे अवकाळीग्रस्तांना मदत मिळत नसताना दुसरीकडे फसव्या जाहिरातीसारखी कर्जमाफी दिली जात आहे. आमच्या काळात २००१ ते २०१७ पासूनचे कर्ज माफ केले गेले. यांच्या सरकारने केवळ दोन वर्र्षांचे कर्ज माफ केले. सप्टेंबर २०१९ ची अट टाकून अवकाळीग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेवले आणि त्यातही अटी-शर्ती लागू असे सांगून जीआर काढला. ही सरकारने केलेली मोठी लबाडी आहे.

एकीकडे राज्यात मलाईदार खात्यांसाठी भांडाभांडी होत असताना कृषी शेती खाते कुणाकडे जावे, यासाठी मात्र कुणीही आग्रही दिसून येत नाही. यातूनच त्यांचे शेतकरी प्रेम दिसून येते. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने अनेक योजना आणल्या आणि आज त्याचा देशाला लाभ होत आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

Web Title: This government will not last long - Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.