महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांवर काम करणारे सरकार - नीलम गोऱ्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 07:46 PM2020-03-06T19:46:05+5:302020-03-06T19:58:07+5:30

अर्थसंकल्पात महिला बचत गटांना अधिक चालना देण्यात आली आहे

Government empowering women empowerment and infrastructure - Neelam Gorhe | महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांवर काम करणारे सरकार - नीलम गोऱ्हे

महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांवर काम करणारे सरकार - नीलम गोऱ्हे

googlenewsNext

मुंबई : महिलांचा सन्मान सातत्याने शिवसेनेने केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्यांना आभार पत्र आणि गुलाबाचे फूल देऊन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अभिनंदन केले. याबद्दल उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी महिलांचे स्वागत केले. 

महिला कर्मचारी व सर्वसामान्य महिलांच्या  योगदानाची दखल स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेऊन एक सकारात्मक पाऊल ऊचलले आहे, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. आज राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात जेंडर आणि बालक याबाबत मूल्यमापन होणार असल्याची घोषणा करण्यात आली. यासाठी नीलम गोऱ्हे प्रयत्न करत होत्या. 

पॉस्कोच्या १०० न्यायालय सुरू करण्यात येणार आहेत. तसेच, प्रत्येक जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी वेगळ्याप्रकारची यंत्रणा उभी करून मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शेतकरी कर्जमुक्ती अधिक व्यापक करुन पायाभुत सुविधा सर्वत्र वाढविल्या आहेत, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. 

याशिवाय, अर्थसंकल्पात महिला बचत गटांना अधिक चालना देण्यात आली आहे. अजून महिला विकास व सर्वांगिण समाजाच्या विकासाचे मोठ्याप्रमाणात काम सरकार आगामी काळातही नियोजन करत असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: Government empowering women empowerment and infrastructure - Neelam Gorhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.