गोपीनाथ मुंडे विमा योजनेची व्याप्ती वाढविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 04:49 AM2019-08-21T04:49:10+5:302019-08-21T04:49:18+5:30

शेती करताना अपघाती मृत्यू, अपंगत्व आल्यास संबंधित शेतक-यास वा त्याच्या कुटुंबास आर्थिक मदत दिली जाते

Gopinath Munde insurance plan extended | गोपीनाथ मुंडे विमा योजनेची व्याप्ती वाढविली

गोपीनाथ मुंडे विमा योजनेची व्याप्ती वाढविली

Next

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविताना खातेधारक शेतकऱ्यासह आता त्याच्या कुटुंबातील एका सदस्याचा समावेश करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली.
शेती करताना अपघाती मृत्यू, अपंगत्व आल्यास संबंधित शेतक-यास वा त्याच्या कुटुंबास आर्थिक मदत दिली जाते. आता ही मदत शेतक-याच्या कुटुंबातील अन्य एका सदस्याचा मृत्यू झाल्यासही दिली जाईल. त्यात शेतकºयाचे आईवडील, पती/पत्नी, मुलगा वा अविवाहित मुलीचा समावेश असेल. शेतकरी आणि या नातेवाइकांपैकी एकास विमा कवच मिळेल. विमा योजनेच्या हप्त्याची रक्कम शासन अदा करेल.

मुद्रांक शुल्क अभय योजनेस ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या तरतुदीनुसार न भरलेल्या मुद्रांक शुल्कावरील शास्ती (दंडाची रक्कम) १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यासंदर्भात मुद्रांक शुल्क अभय योजना राबविली जाते. त्यासाठी १ मार्च २०१९ पासून पुढे सहा महिन्यांपर्यंत होती. ही मुदत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत वाढविली आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील माण आणि खटावमधील जिहे-कठापूर येथील गुरूवर्य दिवंगत लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या १३३० कोटी ७४ लाखांच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंत्रिमंडळ मंजुरी मिळाली. यामुळे २७,५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. लक्ष्मणराव इनामदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रा. स्व. संघातील गुरु आहेत.

Web Title: Gopinath Munde insurance plan extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.