राज्य सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 07:58 PM2020-08-05T19:58:38+5:302020-08-05T20:09:08+5:30

कोरोनामुळेच शिक्षकांनी बदल्यांची घेतली होती धास्ती

Good news for teachers! Administrative transfers of teachers in the state cancelled | राज्य सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द

Next
ठळक मुद्देप्रशासकीय बदल्या रद्द करण्याची प्राथमिक शिक्षकांची केली होती मागणी

बारामती :शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या अखेर रद्द करण्यात आल्या आहेत.याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतल्याने शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे बदल्या होणार नाहीत,असे शिक्षकांना वाटत असतानाच शासनाने बदल्या करण्यास सांगितले होते. कोरोनामुळेच शिक्षकांनी या बदल्यांची धास्ती घेतली होती. मात्र,  शिक्षक संघाच्या मागणीस यश आले आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या निर्णयात बदल केला आहे. यावर्षी फक्त विनंती बदलीचे आदेश दिले आहेत.

शासनाने दिलेल्या आदेशानुसार तसेच तालुकाबाह्य प्रशासकीय बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाल्याची माहिती प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली. जुन्या शासन निर्णयामुळे तालुकाबाह्य प्रशासकीय बदलीच्या भीतीने राज्यभरातील शिक्षक हवालदिल झाले होते. विस्थापित शिक्षकांची विनाअट बदली करावी व प्रशासकीय बदल्या रद्द कराव्यात ही प्राथमिक शिक्षक संघाची मागणी होती,राज्य सरकारकडून निर्णय होण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाने शरद पवार यांची भेट घेतली होती. सोयीच्या बदल्यांसाठी पवार यांनी ग्रामविकास
मंत्री यांना सूचना दिल्या होत्या. पवारांच्या सूचनेनुसार ग्रामविकास
मंत्री यांनी प्राथमिक शिक्षक संघ सोबत कोल्हापूर येथे बैठक घेऊन या
बैठकीत विनंती बदल्या करण्याची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, आमदार रोहित पवार याप्रकरणी मंगळवार(दि ४) पासुन मुंबई येथे थांबुन होते. त्यांनी मुुंबईत थांबुन स्वता लक्ष घातले.त्यानंतर
ग्रामविकास विभागाला जिल्हाअंतर्गत प्रशासकीय बदल्या करताना गर्दी होवुन कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती लक्षात आली.

...विनंती बदल्या करण्याचे आदेश
 राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने याबाबत आज शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. कोरोना आजारामुळे सामाजिक आंतर पाळून फक्त विनंती बदल्या करण्याचे सर्व जिल्हा परिषदांना कळवले असल्याची माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.
—————————————————
... रिक्त जागा वाढवा
राज्य सरकारच्या निदेर्शानुसार सोयीच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदांनी पुढाकार घ्यावा, आंतरजिल्हा बदलीने येणाºया शिक्षकांच्या प्रमाणात समानीकरणाची पदे विनंती बदलीसाठी खुली करावीत अशी शिक्षक संघाने जिल्हा परिषदेकडे मागणी केल्याची माहिती बाळासाहेब मारणे यांनी दिली .
—————————————————

 विस्थापितांसाठी पुढील लढा
 गैरसोयीच्या बदल्या थांबविण्यासाठी शिक्षक संघास यश मिळाले विस्थापित शिक्षकांना विनाअट सोयीच्या बदल्यांसाठी पुढील काळात सरकारकडे पाठपुरावा सुरूच राहील.
संभाजीराव थोरात
राज्य नेते, प्राथमिक शिक्षक संघ
—————————————————

Web Title: Good news for teachers! Administrative transfers of teachers in the state cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.