गडचिरोली : अबुझमाडच्या जंगलात सी-६० कमांडोंनी केला नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, एकाला केले ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 08:04 PM2020-02-17T20:04:49+5:302020-02-17T20:05:03+5:30

सी-६० पथकातील जवान परत येत असताना छत्तीसगडच्या सीमेतील मौजा घमंडी व लाहेरीपासून ४० किलोमीटरवर असलेल्या फोदेवाडा जंगल परिसरात वारंवार त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.

Gadchiroli: One Naxalites killed in encounter with C-60 commandos in Abujhmad forest | गडचिरोली : अबुझमाडच्या जंगलात सी-६० कमांडोंनी केला नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, एकाला केले ठार

गडचिरोली : अबुझमाडच्या जंगलात सी-६० कमांडोंनी केला नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, एकाला केले ठार

Next

गडचिरोली : भामरागड उपविभागांतर्गत येणा-या लाहेरी उपपोलीस ठाण्यापासून ४० किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील अबुझमाडच्या जंगलात पोलिसांनी नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. यावेळी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र इतर नक्षलवादी त्या मृतदेहासह जंगलात पसार झाले. या चकमकीत एक जवानही किरकोळ जखमी झाला.

पोलीस सूत्रानुसार, गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० पथकातील जवान पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनात आणि अपर पो.अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या नेतृत्वात भामरागड तालुक्यात अभियानावर होते. यादरम्यान नक्षलवाद्यांचा सेंट्रल कमिटी मेंबर सोनू उर्फ भूपती याने विघातक कृत्य करण्यासाठीची योजना आखण्यासाठी तळ उभारल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे सी-६० पथकाने तिकडे मोर्चा वळवत हल्ला चढविला. यात एक नक्षलवादी मारल्या गेला. नक्षलवाद्यांनी एके-४७ आणि लाईट मशिनगनसारख्या रायफलने सी-६० पथकावर गोळीबार करत मृत नक्षलवाद्याला आपल्यासोबत घेऊन जंगलात पळ काढला. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली. मात्र सोमवारी दुर्गम भागातील जंगलातून पोलिसांचे पथक भामरागडमध्ये पोहोचले.

जीवाची पर्वा न करता नक्षलवाद्यांचा सामना
सी-६० पथकातील जवान परत येत असताना छत्तीसगडच्या सीमेतील मौजा घमंडी व लाहेरीपासून ४० किलोमीटरवर असलेल्या फोदेवाडा जंगल परिसरात वारंवार त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. परंतू न डगमगता पोलीस जवानांनी तो हल्ला परतवून लावला. यादरम्यान नक्षलवाद्यांची एक गोळी पोलिसांच्या सी-६० पथकातील एका कमांडोच्या पिट्टूतून आरपार गेली. तरीही जवानांनी जीवाची पर्वा न करता मोठ्या संख्येने असलेल्या नक्षलवाद्यांना जेरीस आणले. पथकाच्या या कामगिरीचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले.

Web Title: Gadchiroli: One Naxalites killed in encounter with C-60 commandos in Abujhmad forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.