Former Maharashtra Police Director Arvind Inamdar dies | महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन
महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन

मुंबई - राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे दिर्घआजाराने निधन झालं आहे. हरकिसनदास रुग्णालयात इनामदार यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वय ७९ वर्ष होते. मंत्रालयाजवळील शलाका या निवास्थानी त्यांचे पार्थिव अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. तर मरिन ड्राईव्हच्या चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

अरविंद इनामदार हे प्रामाणिक, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. नाशिकमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रात दीर्घकाळ काम केलं. अनेक नवख्या पोलिसांना घडविण्यात अरविंद इनामदार यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे. जळगावमधलं गाजलेलं सेक्स स्कॅण्डल प्रकरणाचा उलगडा करण्याचं यश त्यांना मिळालं होतं. साहित्य वर्तुळातही त्यांचा मोठा वावर होता. पोलीस लेखक म्हणून अरविंद इनामदार यांची ओळख होती. 

Web Title: Former Maharashtra Police Director Arvind Inamdar dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.