Finally, Subhash Deshmukh said, the real reason for incoming in BJP! | अखेर सुभाष देशमुखांनी सांगितलं, भाजपमधील इनकमिंगचं खरं कारण !

अखेर सुभाष देशमुखांनी सांगितलं, भाजपमधील इनकमिंगचं खरं कारण !

- राजा माने

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा झपाटा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष कार्यापद्धतीमुळे देशातील आणि राज्यातील जनता भाजपच्या पाठिशी उभी आहे. यामुळेच भाजपला लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले. मुख्यमंत्री फडणवीसांच्या कामाचे कौतुक करताना सहकारमंत्री आणि दक्षिण सोलापूरचे भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांनी भाजपमध्ये झालेल्या इनकमिंगचे कारण सांगितले.

'टी विथ लिडर' या लोकमतच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. तसेच देशाच राजकारण जसं मोदींच्या अवतीभवती फिरतं त्याचप्रमाणे राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसच केंद्रबिंदू असल्याचे देशमुख यांनी अवर्जुन सांगितले.

- दक्षिण सोलापूरमध्ये दरवेळी होणारी चुरशीची लढत यावेळी पाहायला मिळत नाही. ही निवडणूक सोपी झाली असं आम्ही एकतोय ?
देशमुख : 20 वर्षापासून मी राजकारणात आहे. राजकारणाचा गंध नसताना 1998 मध्ये मला भारतीय जनता पक्षाने राजकारणात आणलं. 2004 मध्ये मी सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नीविरुद्ध सोलापूरमधून पहिल्यांदा लोकसभेला लढलो. त्यानंतर 2009 मध्ये मी माढा मतदार संघातून लढलो. शरद पवारांविरुद्ध माझा पराभव झाला. त्यानंतर 2009 मध्ये तुळजापूरमधून विधानसभा निवडणूक लढविण्यास सांगितले. तर 2014 मध्ये युती तुटल्यानंतर अखेरच्या क्षणी मला दक्षिण सोलापूरमधून उमेदवारी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांमुळे भारताची प्रतिमा जगात उंचावली आहे. शेतकरी, गरीब आणि शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोदींनी आखलेल्या धोरणामुळे हे सरकार जनतेला आपलंस वाटतं आहे. जनतेचा विश्वास नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून दिसून आला. महाराष्ट्रात देखील केंद्राप्रमाणेच पुनरावृत्ती होईल. मुख्यमंत्र्यांनी राज्यावर आलेली संकट कोणताही आवाज न होता चाणाक्षपणे हाताळली. कर्जमाफी, घरकूल, जलयुक्तशिवार या योजनांमुळे विरोधकांना विजयाची शाश्वती राहिली नाही, म्हणून ते भाजपमध्ये येत आहेत, असंही देशमुख म्हणाले.

- विरोधक बोलत नसले तरी, शिवसेना नियमीत सरकारच्या कामावर आक्षेप नोंदवते. कर्जमाफीवरून सेनेने आक्षेप नोंदवला असून कर्जमुक्तीची भूमिका घेतली. यावर का वाटते ?
देशमुख : शिवसेना असो, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस असो या सर्व पक्षांची धोरणं ठरलेली असतात. त्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटतं की आपला पक्ष मोठा व्हावा. शिवसेनेच्या कर्जमुक्तीच्या बाबतीत म्हणाल, तर फडणवीस यांची भूमिका सुरुवातीपासूनच कर्जमुक्तीची आहे. मोदी आणि फडणवीस यांना देश आणि महाराष्ट्र वैभवशाली करायचा आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना संपन्न करायचा आहे. या भूमिकेप्रमाणेच पक्ष नेतृत्वाकडून कृती करण्यात येत आहे.

- विरोधीपक्षातील नेत्यांच्या इनकमिंगसाठी तुम्ही गळ लावून बसले नव्हते ?
देशमुख : आम्ही कुणालाही आमच्या पक्षात या म्हणून निमंत्रण दिले नाही. परंतु, जनतेने या नेत्यांच्या कानात सांगितले की, आता आम्ही तुमच्यासोबत राहू शकणार नाही. तुम्ही भाजपमध्ये गेलात तर आम्ही तुमच्यासोबत राहू. त्यामुळेच भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

दक्षिण सोलापूर मतदारसंघातील लढाई लुटूपुटू ठरतेय का, येथील राजकारण तुमच्या मते कसं आहे ?
देशमुख : मला असं वाटतं की, कोणतीही निवडणूक लुटूपुटू नसते. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसची भूमिका नेतृत्व ठरवत असते. या मतदार संघात अनेकदा बदल झालेले. सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना याच मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. मात्र मागील साडेतीन वर्षांतील मंत्रीपदाच्या कार्यकाळात हदवाढ भागातील कामं केलीत. कचरा व्यवस्थापन, रस्त्याचं जाळ आम्ही विनले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ रुग्णांच्या उपचारासाठी सात ते आठ कोटींचा निधी मला दिला. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न मुख्यमंत्र्यांनी पाहिलेलं आहे. जनता देखील हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपला साथ देईल, असं मला वाटतं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Finally, Subhash Deshmukh said, the real reason for incoming in BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.