Fight shivsena and bjp in the Buldhana Chikhali constituency | बुलढाण्यातील चिखली मतदारसंघावरून युतीत रस्सीखेच
बुलढाण्यातील चिखली मतदारसंघावरून युतीत रस्सीखेच

मुंबई - विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेनेत युती झाले असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी जागा वाटपाच्या तडजोडीवरून स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याच्या मागणीसाठी जिल्हा सहसंपर्कप्रमुख भास्कर मोरे आक्रमक होताना दिसत आहे. सलग दोन निवडणुकांमध्ये या जागेवर भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे मोदी लाटेत ही भाजपला इथे यश मिळवता आले नसल्याने, हा मतदारसंघ शिवसेनला सोडण्याची मागणी मोरे यांनी केली आहे.

शिवसेना आणि भाजपने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. मात्र आगामी विधानसभेची निवडणूक शिवसेना-भाजप एकत्रितपणे लढणार हे निश्चित झाले आहे. तर चिखली मतदारसंघ हे भाजपकडे आहे. मात्र यावेळी हे मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. एवढच नाही तर हा मुद्दा थेट 'मातोश्री' पर्यंत गेला आहे. चिखली बाबत तडजोड करून हा मतदारसंघ शिवसेनच्या ताब्यात घेऊ असे आश्वासन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला असल्याची माहिती भास्कर मोरे यांनी दिली आहे.

लोकसभेच्या गत दोन निवडणुकीत चिखली मतदार संघातून शिवसेना उमेदवाराला सुमारे ३० हजारांचा लिड मिळाली होती. या मतदारसंघात शिवसेनेचा वचक आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमदेवार त्या ठिकाणी सहज विजय मिळवू शकतो. असा दावा सुद्धा मोरे यांनी केला आहे.  भाजपचा उमदेवार तसाही या ठिकाणी निवडून येत नाही. त्यामुळे ही जागा शिवसेनेला सोडण्याचा हा एकमेव पर्याय ठरू शकतो, असेही मोरे म्हणाले.


Web Title: Fight shivsena and bjp in the Buldhana Chikhali constituency
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.