ऐकत नसतील तर वीज कर्मचाऱ्यांच्या कानाखाली हाणा - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 05:30 PM2021-09-23T17:30:52+5:302021-09-23T17:31:18+5:30

Ravikant Tupkar : त्यांचे कपडे काढा व त्यांच्या कानाखाली हाणा, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी २३ सप्टेंबर राेजी केले.

Explain first, if they are still not listening, then hit under the ears of power workers - Ravikant Tupkar | ऐकत नसतील तर वीज कर्मचाऱ्यांच्या कानाखाली हाणा - रविकांत तुपकर

ऐकत नसतील तर वीज कर्मचाऱ्यांच्या कानाखाली हाणा - रविकांत तुपकर

googlenewsNext

वाशिम : आधिच काेराेनाने अनेक नागरिकांचे नाेकऱ्या हिरावल्यात, अनेक जण बेराेजगार झालेत. आजही अनेकजण घरी बसलेले आहेत. अशात सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा बिले देण्यात येत आहेत. त्यात आता वीज कनेक्शन कापण्याची माेहीम हाती घेण्यात आली आहे. वीज कापणीसाठी येणाऱ्या अधिकारी यांना आधि समजावून सांगा, तरीही ऐकत नसतील तर त्यांचे कपडे काढा व त्यांच्या कानाखाली हाणा, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी २३ सप्टेंबर राेजी केले.

ते वाशिम येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी , कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता बाेलत हाेते. केंद्र सरकारने सोयाबीन पेंड आयात केल्यामुळे महिनाभरात १० हजाराचे दर पाच हजार रुपये झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच मोठ नुकसान होणार आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कपाशीच्या दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचेही तुपकर यांनी सांगितले. तसेच जिल्हयात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे माेठया प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानाचे सर्हे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागणी करणार असल्यसाचे सांगितले. यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामू अण्णा इंगोले,केशव चांडे, पवन राजे देशमुख, किशोर ढगे, श्रीकांत ठाकरे, अरुण , विशाल गोटे,बालाजी मोरे, सतीश इढोले, गणेश गोटे,वैभव जाधव , ओम गायकवाड आदी उपस्थित हाेते.

Web Title: Explain first, if they are still not listening, then hit under the ears of power workers - Ravikant Tupkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.