एल्गार परिषद प्रकरण : क्लोन कॉपी देण्यास लागेल किमान सहा महिन्यांचा कालावधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 04:32 PM2019-07-18T16:32:16+5:302019-07-18T16:32:48+5:30

एल्गार परिषदेतील आरोपींनी आपल्याला क्लोन कॉपी मिळावी अशी मागणी कोर्टाकडे केली होती.

Elgar parishad Case: The Clone Copy is required to be given at least six months duration | एल्गार परिषद प्रकरण : क्लोन कॉपी देण्यास लागेल किमान सहा महिन्यांचा कालावधी

एल्गार परिषद प्रकरण : क्लोन कॉपी देण्यास लागेल किमान सहा महिन्यांचा कालावधी

Next
ठळक मुद्देनऊपैकी केवळ दोन जणांना मिळाली क्लोन कॉपी

पुणे :  एल्गार परिषदेतील आरोपींनी आपल्याला क्लोन कॉपी मिळावी अशी मागणी कोर्टाकडे केली होती. न्यायालयाने ती मान्य केली. मात्र प्रत्यक्षात या क्लोनिंगची कार्यपध्दती प्रचंड वेळखाऊ असून या खटल्यातील एकूण नऊ आरोपींपैकी केवळ दोन आरोपींनाच क्लोन कॉपी मिळाली आहे. उर्वरीत आरोपींना क्लोन कॉपी मिळण्याकरिता किमान सहा महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती एल्गार प्रकरणातील आरोपींचे वकील राहुल देशमुख यांनी दिली. 
 गुरुवारी एल्गार परिषद प्रकरणाची होती. यावेळी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. हजर केल्यानंतर न्यायालयाच्या परिसरातील एका हॉलमध्ये क्लोन कॉपीचे काम सुरु होते.  खटल्याशी संबंधित व्यक्ती व वकील यांनाच केवळ त्या हॉलमध्ये जाण्याची परवानगी असल्याचे सांगण्यात आले. याबाबत देशमुख यांना अधिक विचारले असता ते म्हणाले, एल्गार प्रकरणातील 9 आरोपींना आपल्याला क्लोन कॉपी मिळावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. त्यानुसार त्यांना क्लोन कॉपी देण्याचे काम सुरु झाले आहे.  या प्रकरणात एकूण 18 इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस आहेत. त्या प्रत्येक डिव्हाईसची क्लोन कॉपी  तयार होण्यास सहा तासांचा कालावधी लागतो. याप्रमाणे प्रत्येक डिव्हाईची कॉपी 9 आरोपींमध्ये देण्याकरिता लागणारा वेळ प्रचंड आहे. याकरिता न्यायालयाकडे आरोपींच्या जामिनाची मागणी करण्यात आली होती. जामिन मिळाल्यानंतर देखील क्लोनिंगची प्रक्रिया सुरु ठेवण्यास कुठलीही अडचण नव्हती. 
 त्यामुळे वेळेची उपलब्धता पाहिल्यास यापुढे सहा किंवा वर्षभराचा काळ क्लोनिंग प्रक्रियेकरिता खर्ची पडेल. असे देशमुख  यांनी सांगितले. एल्गार परिषद प्रकरणाची सुनावणी सध्या विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात सुरू आहे. सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन , अरुण फरेरा, वर वरा राव, महेश राऊत, व्हार्नोन गोन्सालविस, सुधा भारद्वाज, रोना विल्सन यांना एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आली आहे. जामिनासाठी राहुल देशमुख, पार्थ शहा, सिद्धार्थ पाटील यांच्या वतीने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

                          

 

Web Title: Elgar parishad Case: The Clone Copy is required to be given at least six months duration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.