अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

By Admin | Updated: July 10, 2014 00:37 IST2014-07-10T00:37:51+5:302014-07-10T00:37:51+5:30

शिक्षण विभागाकडून राबविण्यात आलेल्या अकरावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या ऑनलाइन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली.

The eleventh second quality list was announced | अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल असलेला न्यायालयीन कैदी मंगळवारी सायंकाळी बेपत्ता झाल्याचे उघडकीस आल्यानंतर सकाळी एका शौचालयावर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. मयत कैद्याने आत्महत्त्या केल्याची नोंद पोलिसांनी केली असली, तरी त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्याखाली नाना नामदेव पाटील (वय ४७) यास ३१ मे रोजी अटक करून ४ जून रोजी मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्याच्यावर नाशिक शहरात तीन, भिवंडी, सुरत, गुजराथ या ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
कारागृहात मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे कैद्याची हजेरी घेण्यात आली. यावेळी कारागृहातील २२५० कैद्यांपैकी २२४९ कैदीच हजर होते. कैदी नाना पाटील बेपत्ता असल्याचे निदर्शनास येताच कारागृह प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली. परंतु त्यांचा कुठेच ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता.
आज पुन्हा बेपत्ता कैदी नाना पाटील याचा शोध घेण्यास सुरुवात झाली. कारागृहातील मंडल क्रमांक ७ वॉर्ड क्रमांक ५ मधील बॅरेक क्रमांक १ च्या पाठीमागील बाजूस शौचालय आहे. शौचालयाच्या स्लॅबवर ५०० लिटरची सिन्टेक्सची पाण्याची टाकी असून, त्यामध्ये सकाळी आठ वाजेच्या सुमारास नाना पाटील याचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तहसीलदार यांच्या उपस्थितीत व व्हिडीओ चित्रीकरणाद्वारे पंचनामा व इतर सर्व कार्यवाही करून धुळ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेबाबत मात्र कारागृह व पोलीस वर्तुळात संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The eleventh second quality list was announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.