मोठी घडामोड! एकनाथ शिंदेंची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी; उद्धव ठाकरेंची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 10:28 PM2022-07-01T22:28:17+5:302022-07-01T23:53:00+5:30

Uddhav Thackeray's Action on Eknath Shinde: या पत्राची एक प्रत राष्ट्रीय कार्यकारिणीला देखील देण्यात आली आहे. यामुळे शिंदे गट जो आम्हीच शिवसेना असल्याचा दावा करत आहे, त्यांना धक्का बसला आहे.

Eknath Shinde Latest Update Eknath Shinde Removed from the post of Shiv senas Leader in the party organisation; Uddhav Thackeray Order | मोठी घडामोड! एकनाथ शिंदेंची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी; उद्धव ठाकरेंची कारवाई

मोठी घडामोड! एकनाथ शिंदेंची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी; उद्धव ठाकरेंची कारवाई

Next

गेल्या दहा दिवसांपासुन सुरु असलेले बंड काल एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावर येऊन थांबलेले असताना आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठी कारवाई केली आहे. शिंदे यांची शिवसेनेतील पदांवरून हकालपट्टी केली आहे. याबाबतचे पत्र व्हायरल झाले आहे. 

तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात आणि स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्वही सोडले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील शिवसेना नेते पदावरून काढून टाकत आहे, असे पत्र उद्धव ठाकरेंनी प्रसिद्ध केले आहे. 



 

या पत्राची एक प्रत राष्ट्रीय कार्यकारिणीला देखील देण्यात आली आहे. यामुळे शिंदे गट जो आम्हीच शिवसेना असल्याचा दावा करत आहे, त्यांना धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंनी सकाळीच शिंदे सरकार हे शिवसेनेचे नसल्याचे म्हटले होते. शिंदे सरकारवर कुठेही शिवसेना आणि पक्षप्रमुखांचा पाठिंबा असल्याचा उल्लेख नाहीय, यामुळे हे शिवसेनेचे सरकार नाही, असे ते म्हणाले होते. उद्धव यांनी गुरुवारी, ३० जूनलाच ही कारवाई केली आहे. 

Web Title: Eknath Shinde Latest Update Eknath Shinde Removed from the post of Shiv senas Leader in the party organisation; Uddhav Thackeray Order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.