जीम उघडण्यासाठी दसऱ्याचा मुहूर्त! मुख्यमंत्र्यांचा दिलासा; झुम्बा, स्टीम, सॉना बाथ बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 05:05 AM2020-10-18T05:05:26+5:302020-10-18T05:07:38+5:30

ठाकरे यांनी आज जीम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेत ते बोलत होते. (Uddhav Thackeray)

Dussehra moment to open the gym! CM's consolation; Zumba, steam, sauna bath will be closed | जीम उघडण्यासाठी दसऱ्याचा मुहूर्त! मुख्यमंत्र्यांचा दिलासा; झुम्बा, स्टीम, सॉना बाथ बंद राहणार

जीम उघडण्यासाठी दसऱ्याचा मुहूर्त! मुख्यमंत्र्यांचा दिलासा; झुम्बा, स्टीम, सॉना बाथ बंद राहणार

Next
ठळक मुद्देठाकरे यांनी आज जीम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. प्रशिक्षकाला करावी लागेल वारंवार आरोग्य तपासणीकोणकोणती काळजी घ्यावे याचे नियम ठरविण्यात आले आहेत.


मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मकात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जीम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसºयापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे सांगितले. मात्र, ‘एसओपी’चे काटेकोर पालन करणे आवश्यक असेल.


ठाकरे यांनी आज जीम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेत ते बोलत होते. स्टीम बाथ, सॉना, शॉवर आणि झुम्बा, योगा असे सामुहिक प्रकार ‘एसओपीतील निदेर्शानुसार पूर्णपणे बंद राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

एसओपी'चे काटेकोर पालन न केल्यास, गलथानपणा आढळल्यास मात्र संबंधितावर कठोर कारवाई करणे भाग पडेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

प्रशिक्षकाला करावी लागेल वारंवार आरोग्य तपासणी -
व्यायामासाठी येणाºया सदस्यांना या ‘एसओपी’ची पूर्णपणे माहिती देणे आवश्यक असेल. व्यायाम शाळेच्या वेळा, तसेच मर्यादित संख्येत प्रवेश देणे. प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी यांची वारंवार आरोग्य तपासणी तसेच स्वच्छतेच्या बाबी यासाठी तपशीलाने नियमावली तयार करण्यात आली आहे. कोणकोणती काळजी घ्यावे याचे नियम ठरविण्यात आले आहेत.

शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्क वापरणे या नियमित गोष्टींबरोबरच, क्षेत्रफळांनुसार सुरक्षित शारिरिक अंतर राखणे. व्यायामशाळेचे दर तासाला निजंर्तुकीकरण करणे. उपकरणांमध्ये अंतर ठेवणे, दररोज रात्री जिम,व्यायामशाळा बंद झाल्यानंतर पूर्णपणे निजंर्तुकीकरण करावे लागणार आहे.

Web Title: Dussehra moment to open the gym! CM's consolation; Zumba, steam, sauna bath will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.