विदेशात वाढणाऱ्या कोरोनामुळे महाराष्ट्रातही कोरोना विषयी सावधगिरी बाळगण्याची गरज - दीपक सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 11:32 PM2021-10-23T23:32:32+5:302021-10-23T23:33:28+5:30

ब्रिटनमध्येही कोविड केसेस सापडत आहेत बूस्टर डोस हे अनेकांना दिले गेले असले तरी कोविडचे नियम सोशल डिस्टंसिंग व मास्क घालणे या गोष्टी पाळल्या जात नाहीत. रशियात 21 ऑक्टोबर  रोजी 35416 नवीन केसेस सापडल्या आहेत.

Due to the growing of corona in abroad, There is a need to be careful about corona in Maharashtra too says Deepak Sawant | विदेशात वाढणाऱ्या कोरोनामुळे महाराष्ट्रातही कोरोना विषयी सावधगिरी बाळगण्याची गरज - दीपक सावंत 

विदेशात वाढणाऱ्या कोरोनामुळे महाराष्ट्रातही कोरोना विषयी सावधगिरी बाळगण्याची गरज - दीपक सावंत 

googlenewsNext


मुंबई - गेल्या काही दिवसापासून कोरोना वायरसने चीन रशिया, सिंगापूर, ब्रिटन, न्यूझिलंड या विविध देशांत पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. रशियात तर दररोज एक हजार मृत्यू होत आहे. युकेमध्ये ही मोठ्या प्रमाणावर नवीन केसेस सापडत आहेत. या कोविडने पुन्हा महाराष्ट्राचे दरवाजे पुन्हा ठोठावता कामा नये, म्हणून 100% अनलॉक होताना सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

ब्रिटनमध्येही कोविड केसेस सापडत आहेत बूस्टर डोस हे अनेकांना दिले गेले असले तरी कोविडचे नियम सोशल डिस्टंसिंग व मास्क घालणे या गोष्टी पाळल्या जात नाहीत. रशियात 21 ऑक्टोबर  रोजी 35416 नवीन केसेस सापडल्या आहेत.

भारतात आणि विशेष करून महाराष्ट्रात सणासुदीच्या दिवसात नागरिकांनी व प्रशासनाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विदेशात वाढत असलेल्या कोविडबद्दल चिंता व्यक्त करून महाराष्ट्रातही कोरोना विषयी सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे मत लोकमतकडे व्यक्त केले. तसेच मुंबईकरांनी सण साजरा करताना आत्मसंयम बाळगावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रात गेल्या सात दिवसांपासून मृत्यू व कोविड रुग्ण संख्या कमी असली तरी तोंडावर आलेल्या दिवाळी सणाच्या गर्दीच्या काळात मास्क वापरणे मोहिम प्रशासनाने अधिक तीव्र करणे आवश्यक आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याकडे लक्ष द्यावे, असेही डॉ.दीपक सावंत यांनी म्हटले आहे.

रशियाच्या अध्यक्षांनी 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी म्हणजेच "नॉन वर्किंग डेज" घोषित केले आहेत. रशियाबरोबर चीन या देशांनेसुद्धा आपल्या उत्तर भागात लॉकडाऊन घोषित केला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड सिंगापूर या देशांनी कोविडला रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. न्यूझिलंडमधील मोठ्या शहरी  भागात तर दोन आठवड्याचा लॉकडाऊन घोषित केला आहे. तर सिंगापूर मध्ये 3194 कोरोना रुग्ण मंगळवारी समोर आले. येथील 80 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यांची जरी कोविडची लक्षणे सौम्य असली तरी आरोग्य यंत्रणेवर खूप मोठा ताण पडत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसुद्धा आरोग्य यंत्रणेवर पडणाऱ्या ताणासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.

लसीकरणानंतर तयार झालेली इम्युनिटी आपली किती दिवस रक्षण करील याविषयी कोणीच खात्रीलायक रित्या सांगत नाही. तसेच डब्ल्यूएचओने सांगितल्याप्रमाणे हेल्थकेअर वर्कर्स हे सततच्या कामाच्या ताणामुळे मानसिक दृष्ट्या खचले आहेत. यामुळे त्यांना विश्रांतीची गरज आहे. भारतासह महाराष्ट्रातही डॉक्टर, फ्रन्टलाइन वर्कर्स, नर्सेस यांचा ताण कमी करणे आवश्यक आहे. तसेच सर्वांचे लसीकरण होणे आवश्यक आहे अशा सूचना डब्ल्यूएचओने दिल्या असून 22 प्रगतशील राष्ट्रात 80 टक्के हेल्थ वर्कर्सचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही हेल्थकेअर वर्करची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना सध्याच्या कमी केसेसच्या काळात विश्रांती दिली पाहिजे असे मत डॉक्टर दीपक सावंत यांनी व्यक्त केले.
 

Web Title: Due to the growing of corona in abroad, There is a need to be careful about corona in Maharashtra too says Deepak Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.