Coronavirus in Maharashtra: "उद्धव ठाकरेंनी कोरोनाचा खूप अभ्यास केलाय; त्यांना डॉक्टरांपेक्षाही जास्त नॉलेज"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 12:35 PM2021-03-20T12:35:13+5:302021-03-20T12:40:02+5:30

Coronavirus in Maharashtra: गेल्या वर्षी राज्यात कोरोनानं अक्षरशः कहर केला होता. जनमानसांत प्रचंड घबराट पसरली होती. अशा परिस्थितीत, न डगमगता या संकटाशी मुकाबला करून जनतेला धीर देण्याचं काम करणाऱ्यांमध्ये डॉ. तात्याराव लहाने यांचं योगदान मोठं होतं.

Dr. Tatyarao Lahane praises CM Uddhav Thackeray for his Coronavirus study and knowledge | Coronavirus in Maharashtra: "उद्धव ठाकरेंनी कोरोनाचा खूप अभ्यास केलाय; त्यांना डॉक्टरांपेक्षाही जास्त नॉलेज"

Coronavirus in Maharashtra: "उद्धव ठाकरेंनी कोरोनाचा खूप अभ्यास केलाय; त्यांना डॉक्टरांपेक्षाही जास्त नॉलेज"

Next
ठळक मुद्देडॉ. तात्याराव लहाने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोरोना ज्ञानाचं कौतुक केलं आहे. राज्यातील कोरोना मृत्यूदर ३८ टक्क्यांवरून आज अडीच टक्क्यांच्याही खाली आला आहे.

कोरोनाच्या लाटेचा दुसरा फेरा महाराष्ट्राच्या डोक्यावर घोंघावताना दिसतोय. गेल्या सहा दिवसांत राज्यात एक लाख नऊ हजारहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या वर्षी कोरोना संकटाशी जिद्दीनं दोन हात करणारं, कौतुकास पात्र ठरलेलं ठाकरे सरकार आता काय पावलं उचलणार, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या पार्श्वभूमीवर, राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक, ज्येष्ठ नेत्र शल्य चिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोरोना ज्ञानाचं कौतुक केलं आहे. त्यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळेच आपण कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लक्षवेधी कामगिरी करू शकलो, असं त्यांनी प्रांजळपणे सांगितलं. (CM Uddhav Thackeray's study and knowledge on Coronavirus pandemic is commendable: Dr. Tatyarao Lahane)

कोरोनाचा उद्रेक! गेल्या 24 तासांत 40,953 नवे रुग्ण, धडकी भरवणारी आकडेवारी

गेल्या वर्षी राज्यात कोरोनानं अक्षरशः कहर केला होता. जनमानसांत प्रचंड घबराट पसरली होती. अशा परिस्थितीत, न डगमगता या संकटाशी मुकाबला करून जनतेला धीर देण्याचं काम करणाऱ्यांमध्ये डॉ. तात्याराव लहाने यांचं योगदान मोठं होतं. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून डॉ. लहानेंना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी, राज्य सरकारनं केलेल्या सहकार्याचा डॉ. लहाने यांनी आवर्जून उल्लेख केला. 

जी लस उपलब्ध असेल तीच घ्या, पर्याय नको! महापालिका आयुक्तांचे आवाहन

''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा इतका अभ्यास केला आहे की आम्हा डॉक्टरांपेक्षा त्यांचं कोरोनाचं ज्ञान अधिक आहे. उद्धव ठाकरे आणि मंत्री अमित देशमुख यांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही कोरोना संकटाचा यशस्वी सामना करू शकलो. रोज २ लाख टेस्ट करू शकू एवढ्या लॅब आज महाराष्ट्रात आहेत. राज्यातील कोरोना मृत्यूदर ३८ टक्क्यांवरून आज अडीच टक्क्यांच्याही खाली आला आहे. हे सरकारच्या सहकार्यामुळेच शक्य झालं'', असं मनोगत डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केलं.

...अन्यथा पुढील दहा दिवसांत पुण्यातील रुग्णालयात एकही बेड शिल्लक राहणार नाही!

कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागलेत. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणं गरजेचं आहे. हा आजार आणखी वर्षभर आपल्यासोबत राहणार आहे. म्हणून मास्क लावावा लागणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

...अन्यथा पुन्हा लॉकडाऊन

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत असताना राज्य शासनाने शुक्रवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार सर्व खासगी आस्थापना आणि कार्यालयांमध्ये ५० टक्केच कर्मचारी उपस्थिती राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयांसाठी ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचा आदेश आधीच काढण्यात आला आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याने अजूनही लोकांनी काळजी घ्यावी, नियम पाळावेत ही कळकळीची विनंती आहे. अन्यथा, पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

देशात ३९,७२६ नवे रुग्ण 

देशात शुक्रवारी ३९,७२६ नवे रुग्ण आढळून आले. हा यंदाच्या वर्षीचा, तसेच गेल्या ११० दिवसांतील सर्वात मोठा आकडा आहे. शुक्रवारी १५४ जण मरण पावले असून, ही संख्या आदल्या दिवशीपेक्षा कमी आहे. कोरोना बळींची संख्या १ लाख ६० हजारांच्या घरात पोहोचली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९६.२६ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे. पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे आणि नाशिक ही पाच शहरं कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत.

Read in English

Web Title: Dr. Tatyarao Lahane praises CM Uddhav Thackeray for his Coronavirus study and knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.