अखेर गूढ उकललं! पाेटच्या मुलानेच केला प्रा. राजन शिंदे यांचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 06:58 AM2021-10-19T06:58:20+5:302021-10-19T06:58:43+5:30

औरंगाबादेतील मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. राजन हरिभाऊ शिंदे (५१) यांचा गेल्या सोमवारी निर्घृण खून झाल्याने खळबळ उडाली होती. या खुनाचे गूढ उकलण्यात औरंगाबाद पोलिसांना आठ दिवसांनी यश आले.

Dr Rajan Shinde murder case revealed Juvenile accused arrested by police | अखेर गूढ उकललं! पाेटच्या मुलानेच केला प्रा. राजन शिंदे यांचा खून

अखेर गूढ उकललं! पाेटच्या मुलानेच केला प्रा. राजन शिंदे यांचा खून

googlenewsNext

औरंगाबाद : राज्यभर गाजलेल्या प्रा. डॉ. राजन शिंदे यांच्या खुनाचे गूढ आठ दिवसांच्या शोध मोहिमेनंतर सोमवारी उलगडले. डॉ. शिंदे झोपेत असताना त्यांच्याच अल्पवयीन मुलाने (विधिसंघर्षग्रस्त बालक) डंबेल्सने वार करून बेशुद्ध केले. त्यानंतर चाकूने गळा, दोन्ही हाताच्या नसा, कान कापल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबादेतील मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. राजन हरिभाऊ शिंदे (५१) यांचा गेल्या सोमवारी निर्घृण खून झाल्याने खळबळ उडाली होती. या खुनाचे गूढ उकलण्यात औरंगाबाद पोलिसांना आठ दिवसांनी यश आले. या खुनाच्या तपासाची माहिती सोमवारी पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पोलीस अधिकारी म्हणाले की, अल्पवयीन मुलगा आणि मयत डॉ. शिंदे यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते. करिअर निवडण्यातून त्यांचे वाद टोकाला गेले होते. घटनेच्या दिवशी झोपण्यापूर्वी अल्पवयीन मुलगा आणि डॉ. शिंदे यांच्यात किरकोळ वाद झाला होता. डॉ. शिंदे झोपेत असताना अल्पवयीन मुलाने त्यांच्या मानेच्या वरील भागात डंबेल्सने वार केले. त्यानंतर चाकूने गळा, हाताच्या नसा कापल्या. 

निरीक्षणगृहात रवानगी
पोलिसांनी अल्पवयीन मुलास सोमवारी बाल न्यायमंडळासमोर हजर केले. मुलाची रवानगी निरीक्षणगृहात करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सायबरचे निरीक्षक गौतम पातारे आदी उपस्थित होते.

 

Web Title: Dr Rajan Shinde murder case revealed Juvenile accused arrested by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.