गाढविणीचे दूध मौल्यवान; लीटरला दहा हजार भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 09:55 AM2021-08-07T09:55:38+5:302021-08-07T09:56:03+5:30

Donkey's milk: आपल्याला सर्वसाधारणपणे गाय, म्हैस आणि बकरी यांचे दूध पिण्याची सवय आहे. गाढविणीच्या दुधाची आपल्याला सवय नसली तरी तिचे दूध चक्क दहा हजार रुपये लिटरने विकले जाऊ लागले आहे.

Donkey's milk is valuable; Ten thousand price per liter | गाढविणीचे दूध मौल्यवान; लीटरला दहा हजार भाव

गाढविणीचे दूध मौल्यवान; लीटरला दहा हजार भाव

googlenewsNext

उमरगा (जि. उस्मानाबाद)  : आपल्याला सर्वसाधारणपणे गाय, म्हैस आणि बकरी यांचे दूध पिण्याची सवय आहे. गाढविणीच्या दुधाची आपल्याला सवय नसली तरी तिचे दूध चक्क दहा हजार रुपये लिटरने विकले जाऊ लागले आहे. उमरगा शहरात सध्या दहा व्यवसायिक  गाढविणीच्या दुधाची घरोघरी जावून विक्री करत आहेत. 
शंभर रुपयाला १० मिलि याप्रमाणे हे दूध विकले जात आहे. हे लोक गाढविणीला सोबत घेऊन गल्लोगल्ली फिरत आहेत. गाढविणीच्या दुधामुळे सर्दी, खोकला, कफ, न्यूमोनिया असे आजार होत नाहीत. मुख्यत्वे लहान मुलांना असे आजार होऊ नयेत व झाल्यास दुरुस्त होण्यासाठी पूर्वीच्या काळी असा इलाज केला जायचा, अशी माहिती नांदेड येथून गाढविणीचे दूध विक्रीसाठी आलेल्या मनोज मासेवाड या व्यावसायिकाने सांगितले. 

 गाढविणीच्या दुधामध्ये असणाऱ्या जिवाणूच्या संख्येपैकी ८० टक्के जिवाणू हे लॅक्टिक ॲसिड  बॅक्टेरियाचे जिवाणू असतात. हे पोटाचे विकार टाळण्यासाठी महत्त्वाचे असतात. गाढवाच्या दुधाचा वापर अलीकडे हृदयाविकार टाळण्यासाठीदेखील होत आहे, तसेच संसर्गजन्य रोग, यकृत संबंधित आजार, ताप आणि दमा या आजारातदेखील याचा औषधी म्हणून वापर होतो. सौंदर्य प्रसाधनामध्ये केला जातो. त्यामुळे या दुधाचे  महत्त्व आणि किंमत वाढली आहे.
- डॉ. दत्तात्रय इंगोले, 
पशुधन विकास अधिकारी

Web Title: Donkey's milk is valuable; Ten thousand price per liter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :milkदूध