पोस्टमनना तंदुरुस्त ठेवण्यासाठी दिवेकर पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 07:08 AM2019-08-27T07:08:16+5:302019-08-27T07:08:27+5:30

टपाल खाते चहाऐवजी लिंबूपाणी देणार

Divekar pattern to keep postmen fit | पोस्टमनना तंदुरुस्त ठेवण्यासाठी दिवेकर पॅटर्न

पोस्टमनना तंदुरुस्त ठेवण्यासाठी दिवेकर पॅटर्न

googlenewsNext

मुंबई : दिवसभर उन्हातान्हात फिरणाऱ्या व कामाच्या ताणामुळे जेवणाच्या वेळा चुकत असणाºया पोस्टमनच्या तंदुरुस्तीसाठी टपाल खात्याने आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचे मार्गदर्शन घेतले आहे. टपाल खात्याचा आयकॉन असलेल्या पोस्टमनचे आरोग्य अधिक सुदृढ करण्यासाठी आता दिवेकर यांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांना आहार घेण्यास सांगण्यात आले आहे.
मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे यांच्या संकल्पनेतून पोस्टमनना अधिक तंदुरुस्त ठेवण्यासाठी दिवेकर यांचे मार्गदर्शन घेण्याचे ठरवण्यात आले. त्यानंतर दिवेकर यांनी जीपीओमध्ये येऊन पोस्टमनसोबत संवाद साधला व त्यांना आहाराबाबत मार्गदर्शन केले. दिवेकर यांच्या सल्ल्याप्रमाणे टपाल कर्मचाऱ्यांना चहाऐवजी लिंबूपाणी पुरविण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती स्वाती पांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पोस्टमन हा टपाल खात्याचा आरसा आहे. मात्र त्यांच्या आरोग्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. त्यामुळे पोस्टमनची फिटनेस लेव्हल वाढविण्याचा विचार केला व त्यासाठी दिवेकर यांना आमंत्रित करण्यात आले. दिवेकर यांनी पोस्टमन व टपाल कर्मचाºयांना बहुमोल सल्ला दिला असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज पांडे यांनी व्यक्त केली.
तर, या वेळी मार्गदर्शन करताना दिवेकर म्हणाल्या, मी अनेक ठिकाणी गेल्यावर तेथील व्यक्तींना जास्तीतजास्त चालण्याचा सल्ला देते. मात्र, पोस्टमन मुळातच दिवसभर चालत असल्याने त्यांना हा सल्ला देऊ शकत नाही. पोस्टमन किती कष्ट करतात व काम करतात याची जाणीव आहे. ती सर्वांनाच असायला हवी. पोस्टमननी त्यांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Divekar pattern to keep postmen fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.