संभाजी भिडेंकडून नितीन चौगुलेंचं निलंबन; शिवप्रतिष्ठानमधील वाद चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 03:33 AM2021-02-07T03:33:38+5:302021-02-07T07:48:00+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले कार्यवाह नितीन चौगुले यांना संभाजी भिडे यांनी निलंबित केल्यामुळे संघटनेतील वाद चव्हाट्यावर आला.

Dispute in Shiv Pratishthan after sambhaji bhide suspends nitin chougule amp | संभाजी भिडेंकडून नितीन चौगुलेंचं निलंबन; शिवप्रतिष्ठानमधील वाद चव्हाट्यावर

संभाजी भिडेंकडून नितीन चौगुलेंचं निलंबन; शिवप्रतिष्ठानमधील वाद चव्हाट्यावर

Next

सांगली : राज्यभर विस्तारलेली व प्रखर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारी शिवप्रतिष्ठान संघटना आता कार्यवाह पदावरील कार्यकर्त्याच्या निलंबन कारवाईमुळे चर्चेत आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले कार्यवाह नितीन चौगुले यांना संभाजी भिडे यांनी निलंबित केल्यामुळे संघटनेतील वाद चव्हाट्यावर आला.

शिवप्रतिष्ठान संघटनेची व्याप्ती मोठी आहे. राज्यातील मोठी हिंदुत्ववादी संघटना म्हणून ती परिचित आहे. गेल्या काही महिन्यांपासून या संघटनेत वाद धुमसत होता. गेल्या अनेक वर्षांपासून चौगुले संघटनेच्या प्रत्येक उपक्रमांमध्ये अग्रभागी होते. संस्थापक संभाजी भिडे यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते परिचित होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याबद्दल अंतर्गत तक्रारी सुरू झाल्या होत्या. कारवाई करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार त्यांना संघटनेतून निलंबित करण्यात आले. चौगुले यांच्याबद्दल नेमकी काय तक्रार होती, याचा संघटनेने फारसा खुलासा केलेला नाही. या कारवाईबाबत चौगुले व त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शुक्रवारी गावभागात चौगुले समर्थकांनी कारवाई मागे घ्यावी म्हणून भिडे यांना विनंती केली होती. भिडे यांनी कारवाईवर ठाम राहण्याची भूमिका घेतली. 

संभाजी भिडे यांनी ही कारवाई केली आहे. चौगुले यांच्याबद्दल दोन वर्षांपासून तक्रारी येत होत्या. त्यामुळे कारवाई झाली आहे. त्यांना संघटनेतून निलंबित केले आहे, असे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी सांगितले.

Web Title: Dispute in Shiv Pratishthan after sambhaji bhide suspends nitin chougule amp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.