विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण होणार कार्यमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 12:52 PM2019-07-10T12:52:52+5:302019-07-10T12:59:14+5:30

विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदाकडे नेहमीच काटेरी मुकुट म्हणून पाहिले गेले.

Director of the University's Examination and Valuation Board Dr. Ashok Chavan will get job free | विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण होणार कार्यमुक्त

विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण होणार कार्यमुक्त

Next
ठळक मुद्देविद्यापीठाच्या परीक्षा मंडळ संचालक पदाचा दिला राजीनामा नवीन परीक्षा मंडळ संचालकांचा शोध घ्यावा लागणार ऑनलाईन पध्दतीने पाठविल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकेच्या कामकाजात झाला होता गोंधळ

पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्यापरीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अशोक चव्हाण यांनी परीक्षा व मुल्यमापन मंडळ संचालक पदाचा राजीमाना दिला असून येत्या दोन आठवड्यात त्यांना कार्यमुक्त केले जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाला पुन्हा एकदा नवीन परीक्षा मंडळाच्या संचालकांचा शोध घ्यावा लागणार आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदाकडे नेहमीच काटेरी मुकुट म्हणून पाहिले गेले. त्यामुळेच माजी परीक्षा नियंत्रक डॉ.संपदा जोशी यांनी आपला कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर माजी उपकुलसचिव बाळासाहेब नाईक तसेच तत्कालीन बीसीयुडी डॉ.व्ही.बी.गायकवाड यांनी काही काळ परीक्षा नियंत्रक पदाची सूत्रे स्वीकारली. मात्र, माजी कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांच्या कार्यकालात डॉ.अशोक चव्हाण यांची परीक्षा नियंत्रक पदी पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली. नवीन कायद्यात परीक्षा नियंत्रक पदाचे नाव परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक असे करण्यात आले. सुमारे साडेचार वर्षे अशोक चव्हाण यांनी या पदावर काम केले. मात्र, आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे विद्यापीठाला नवीन परीक्षा मंडळ संचालकांचा शोध घ्यावा लागणार आहे.तसेच पुढील काही दिवस या पदाचा कार्यभार दुस-या सक्षम व्यक्तीकडे द्यावा लागणार आहे.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना परीक्षा मंडळाकडून ऑनलाईन पध्दतीने पाठविल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकेच्या कामकाजात गोंधळ झाला होता. त्यामुळे विद्यापीठाची चांगलीच नाचक्की झाली होती.त्यावर विद्यापीठाकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली.या समितीने आपला अहवाल कुलगुरू कार्यालयाकडे सूपूर्द केला असून याविषयावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतही चर्चा झाली.त्यात परीक्षा विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले.आता चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे विद्यापीठ वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.परंतु,वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे अशोक चव्हाण यांच्याकडून सांगितले जात आहे.
गेल्या काही वर्षात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या नियंत्रक पदाचा कार्यकाल एकाही व्यक्तीने पूर्ण केला नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून या पदाचा कार्यभार दुस-या सक्षम व्यक्तीकडे द्यावा लागणार आहे.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना परीक्षा मंडळाकडून ऑ नलाईन पध्दतीने पाठविल्या जाणा-या प्रश्नपत्रिकेच्या कामकाजात गोंधळ झाला होता. त्यामुळे विद्यापीठाची चांगलीच नाचक्की झाली होती.त्यावर विद्यापीठाकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली.या समितीने आपला अहवाल कुलगुरू कार्यालयाकडे सूपूर्द केला असून याविषयावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतही चर्चा झाली.त्यात परीक्षा विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले.आता चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे विद्यापीठ वतुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.परंतु,वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे अशोक चव्हाण यांच्याकडून सांगितले जात आहे.
गेल्या काही वर्षात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या नियंत्रक पदाचा कार्यकाल एकाही व्यक्तीने पूर्ण केला नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून या पदावर काम करणा-या व्यक्तीला सहकार्य दिले जात नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो.तसेच चव्हाण यांनी जानेवारी २०२० मध्ये आपला कार्यकाल संपत असताना त्यापूर्वीच का राजीनामा दिला? याचा ही विचार विद्यापीठाने करणे गरजेचे आहे,असेही बोलले जात आहे.दरम्यान चव्हाण यांनी दिलेला राजीमाना विद्यापीठाकडून स्वीकारण्यात आला असून त्यांना येत्या २२ जुलै रोजी कार्यमुक्त केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

...........
गेल्या साडेचार वर्षात परीक्षा विभागात सर्व सहका-यांना बरोबर घेऊन चांगले काम करता आले.मात्र,घरगुती कारणामुळे मी राजीनामा दिला आहे.परीक्षा मंडळ संचालक पदावरून कार्यमुक्त झाल्यावर पुन्हा औरंगाबाद विद्यापीठात बॅटनी विभागात प्राध्यापक पदावर रुजू होण्यासाठी जाणार आहे.
डॉ.अशोक चव्हाण,संचालक,परीक्षा व मुल्यमापन मंडळ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
 

Web Title: Director of the University's Examination and Valuation Board Dr. Ashok Chavan will get job free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.