Dhananjay Munde political attack on Narendra Modi | मोदी साहेब मानलं तुमच्या निधड्या छातीला: धनंजय मुंडे
मोदी साहेब मानलं तुमच्या निधड्या छातीला: धनंजय मुंडे

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाजनादेश यात्रेला भाजपाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली होती. या महाजनादेश यात्रेचा समारोप गुरुवारी नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत करण्यात आले. मोदींच्या याच नाशिक दौऱ्यावरून विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जोरदार हल्ला चढवला. नाशिकला छावणीचे स्वरूप आले असून, सामन्य कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येत आहे. तर मोदी साहेब मानलं तुमच्या निधड्या छातीला असा  खोचक टोला मुंडे यांनी मोदींना लगावला आहे.

महाजनादेश यात्रेच्या समारोपाचे कार्यक्रम गुरुवारी मोदींच्या उपस्थित नाशिकमध्ये पार पडला. मात्र त्यापूर्वी सुरक्षेचे कारण देत आंदोलनाचे इशारा देणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरु केली होती . तर तब्बल अडीच हजारहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले. मोदींच्या सभेला जाणाऱ्या व्यक्तींना काळे कपडे,पिशव्या व इतर साहित्य नेण्यास बंदी करण्यात आली असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या पंतप्रधानांचा हा दौरा होता. त्यामुळे मोदी साहेब मानलं तुमच्या निधड्या छातीला अशी मिश्कील टीका मुंडे यांनी मोदींवर केली. त्याचबरोबर त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा नेहमीप्रमाणे निशाना साधला.

 

 

 

 

Web Title: Dhananjay Munde political attack on Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.