Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 08:12 AM2019-11-23T08:12:39+5:302019-11-23T09:23:34+5:30

एकीकडे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आहे.

Devendra Fadnavis takes oath as Maharashtra Chief Minister again | Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली शपथ

Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली शपथ

googlenewsNext

मुंबई : एकीकडे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले की, राज्यात शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे. तीन्ही पक्षांच्या बैठकांचे सत्र काही संपत नव्हते. यामुळे आम्ही भाजपासोबत दोन पक्षांचे सरकार स्थापने करायचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा. 


तर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी, शिवसेनेला दोष देताना जनादेशाला त्यांनी नाकारले. राज्यात तीन पक्षांचे सरकार आले तर ते टिकेल की नाही याबाबत माहिती नाही. यामुळे अजित पवारांशी संपर्क साधला आणि स्थिर सरकार देण्याची चर्चा केली. अजित पवारांना शुभेच्छा, असे सांगितले.

Web Title: Devendra Fadnavis takes oath as Maharashtra Chief Minister again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.