बारामतीतून थेट "अजितदादां" ना आव्हान देण्याचे धाडस दाखवणाऱ्या " ढाण्या वाघा" ला देवेंद्र फडणवीसांकडून विधानपरिषदेचे गिफ्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 06:45 PM2020-05-08T18:45:43+5:302020-05-08T18:52:57+5:30

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश अंतिम मानत गोपीचंद पडळकर यांनी सुरक्षित मतदारसंघाची पर्वा न करता थेट राष्ट्रवादीचे माहेरघर,अभेद्य गड असणारी बारामती गाठली....

Devendra Fadnavis gift to Gopichand Padalkar of Vidhan parishad | बारामतीतून थेट "अजितदादां" ना आव्हान देण्याचे धाडस दाखवणाऱ्या " ढाण्या वाघा" ला देवेंद्र फडणवीसांकडून विधानपरिषदेचे गिफ्ट 

बारामतीतून थेट "अजितदादां" ना आव्हान देण्याचे धाडस दाखवणाऱ्या " ढाण्या वाघा" ला देवेंद्र फडणवीसांकडून विधानपरिषदेचे गिफ्ट 

Next
ठळक मुद्देजातीय गणितांच्या पार्श्वभुमीवर पडळकर यांची उमेदवारी आव्हान निर्माण करेल असा होता अंदाज

बारामती : ऑक्टोंबर २०१९ मध्ये पार पडलेल्या बारामती विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना १लाख ९३ हजार ५०५ मते भाजपचे उमेदवार गोपींचद पडळकर यांना ३० हजार ७६ मते मिळाली. या निवडणुकीत प्रथमच पवार यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांनी ''ढाण्या वाघ '' म्हणुन संबोधलेल्या गोपीचंद पडळकर यांच्यासह सर्वच विरोधी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढवली होती. मात्र, केवळ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सुचनेनसुार राष्ट्रवादीचे माहेरघर,अभेद्य गड असणारी बारामती विधानसभा निवडणुक लढविण्याचे धाडस पडळकर यांनी केले.या धाडसाचेच पडळकर यांना विधानपरिषद उमेदवारीरुपी गिफ्ट मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

या निवडणुकीत पवार यांना १ लाख ६५हजार २६५ मतांचे मताधिक्य मिळाले.पवार यांना १ लाख ९५ हजार ६४१,तर भाजपचे गोपीचंद पडळकर यांना अवघी ३० हजार ३७६ मते मिळाली आहेत. मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या स्थानिक इच्छुकांना बाजुला ठेवताना मतदारसंघातील जातीय गणितांचा संदर्भ डोळ्यासमोर ठेवल्याची चर्चा होती.या संदभार्नुसार गोपीचंद पडळकर यांना पवार यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. बारामती तालुक्यात धनगर समाजाची संख्या मोठी आहे. या जातीय गणितांच्या पार्श्वभुमीवर पवार यांच्याविरोधात पडळकर आव्हान निर्माण करु शकले नाहीत.मात्र, देवेंद्र फडवणीस यांनी अजित पवार यांच्या विरोधात पडळकर यांची बारामती मधुन भाजपच्या वतीने उमेदवारी जाहीर केली. फडवणीस यांचा आदेश अंतिम मानत पडळकर यांनी सुरक्षित मतदारसंघाची पर्वा न करता थेट बारामती गाठली.यावेळी पडळकर घरी न जाता जवळील कपड्याच्या एक दोन जोडसह मुंबईतुन थेट बारामतीत आले.

विधानसभा निवडणुकीपर्यंत पडळकर त्यांच्या घरी देखील गेले नाहीत.पडळकर यांनी जिरायती भागातील पाणी प्रश्नाचा मुद्दा या निवडणुकीच्या प्रचारसभेत आक्रमकपणे मांडला.खुद्द फडवणीस यांनी पडळकर यांच्या प्रचारार्थ जिरायती भागात सभा देखील घेतली.मात्र, अवघ्या दोन प्रचारसभा घेणाऱ्या अजित पवार यांच्या पारड्यात येथील मतदारांनी विक्रमी मते टाकली.अजितदादा यांच्या विजयासाठी या मतदार संघात लोकसभे प्रमाणेच '' पवारपॉवर'' फॅक्टर महत्वाचा ठरला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मतदारसंघातील प्रभावामुळे विरोधक पुन्हा एकदा निष्प्रभ ठरले.

बारामतीत पडळकर यांना उमेदवारी देताना फडवणीस यांनी पुढाकार घेवुन बारामतीच्या भाजपच्या स्थानिक इच्छुकांना बाजुला सारले. त्यानंतर बारामतीशी संबंध नसणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना पवार यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. त्यासाठी भाजपने मतदारसंघातील जातीयगणितांचा संदर्भ डोळ्यासमोर ठेवल्याची चर्चा होती. बारामती तालुक्यातधनगर समाजाची संख्या मोठी आहे. या जातीय गणितांच्या पार्श्वभुमीवर पवार यांच्याविरोधात पडळकर यांची उमेदवारी आव्हान निर्माण करेल,असा भाजपचा अंदाज होता.मात्र, पवार यांना मिळालेल्या मताधिक्क्याने हा अंदाज सपशेल खोटा ठरला .भाजपने बाहेरचा उमेदवार देवुन चुक केल्याची चर्चा विधानसभा निवडणुकीनंतर रंगली.पडळकर यांच्यासाठी भाजप सेनेसह सर्वच मित्रपक्षांनी एकजुटीने प्रचार केला होता. मात्र, अजित पवार यांच्या प्रभावाने झाकोळुन गेलेले पडळकर माजी मुख्यमंत्र्यांच्या वरद हस्ताने पुन्हा उजळणार आहेत.

बारामतीत पवारांंच्या बालेकिल्यात पडळकर यांनी दिलेल्या लढतीचे गिफ्ट या विधानपरिषद उमेदवारीच्या रुपाने मिळाल्याचे देखील बोलले जात आहे.त्या माध्यमातुन धनगर समाजातील आक्रमक चेहरा असणाऱ्या पडळकर यांचे फडणवीस यांनी राजकीय पुनर्वसन केले आहे. यापुर्वी देखील पवारांच्या बालेकिल्यात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची दमछाक केली होती.या लोकसभा निवडणुकीत सुळे यांना जानकर यांच्याविरोधात अवघी ६९ हजार ६६६ अधिक मते मिळाली होती.जानकर यांनादेखील विधानपरिषदेची उमेदवारी,मंत्रीपद देत त्यांना भाजप नेत्यांनी बळ दिले होते .

........

भाजप नेत्यांचे हर्षवर्धन पाटील यांच्याकडे दुर्लक्ष?

माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भाजपच्या वतीने विधानपरिषद उमेदवारी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय क्षेत्रात सुरु होती.मात्र, गोपिचंद पडळकर ,रणजितसिंह मोहिते पाटील यांची नावे पुढे आल्यानंतर पाटील यांचे नाव मागे पडल्याचे स्पष्ट झाले आहे. पाटीलराज्यातील मातब्बर नेते मानले जातात,त्यांच्या भाजप प्रवेशासाठी महत्वाचीभुमिका बजावणाऱ्या मोहिते पाटील यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. ही उमेदवारी देवुन मोहिते पाटील यांना बळ देणाऱ्या भाजप नेत्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे दुर्लक्ष केल्याची भावना इंदापुरच्या पाटील समर्थकांमध्ये आहे.

Web Title: Devendra Fadnavis gift to Gopichand Padalkar of Vidhan parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.