उपमुख्यमंत्र्यांची 'मोठी' घोषणा; राज्यातील शाळा दिवाळीपूर्वी सुरू होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 08:34 PM2020-10-16T20:34:25+5:302020-10-16T20:45:33+5:30

दिवाळीनंतरही कोरोनाचा अंदाज घेऊनच शाळा सुरू करण्याबाबतचा राज्य सरकार निर्णय घेणार....

Deputy Chief Minister's big announcement; Schools in the state will not start before Diwali | उपमुख्यमंत्र्यांची 'मोठी' घोषणा; राज्यातील शाळा दिवाळीपूर्वी सुरू होणार नाही

उपमुख्यमंत्र्यांची 'मोठी' घोषणा; राज्यातील शाळा दिवाळीपूर्वी सुरू होणार नाही

googlenewsNext
ठळक मुद्दे डिसेंबर-जानेवारीत दुसरी लाट येण्याची शक्यता

पुणे : शाळा सुरू होणार की नाही, अशी चर्चा सुरू आहे. पण दिवाळीपूर्वी राज्यातील शाळा सुरू होणार नाहीत. तसेच दिवाळीनंतरही कोरोनाचा अंदाज घेऊनच शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. 

डिसेंबर-जानेवारीमध्ये कोरोनाची लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.

राज्य शासन व पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने आयोजित ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. पवार म्हणाले, देशातील काही राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. पण शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढू लागले. हे लक्षात आल्यानंतर तेथील शाळा बंद करण्यात आल्या. त्यामुळे राज्यात दिवाळीपूर्वी शाळा सुरू होणार नाहीत. दिवाळीनंतरही अंदाज घेतल्यानंतरच शाळा सुरू केल्या जातील. कोरोनाची परिस्थिती सुधारत असली तरी ते त्याकडे दुर्लक्ष नको. नियमांचे काटेकोर पालन करायला हवे. दुसऱ्या लाटेचा अंदाज खोटा ठरवायचा असेल तर अधिक खबरदारीने वागायला हवे. मागील सात महिन्यांपासून आपण कोणताही सण साजरा करू शकलो नाही. येणारे नवरात्रही साधेपणाने करू. विनाकारण गर्दी करू नये, असा आवाहनही पवार यांनी केले.

Web Title: Deputy Chief Minister's big announcement; Schools in the state will not start before Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.