"भिडेवाडा वास्तु संदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने त्वरित समितीचे गठन करावे"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 02:27 PM2021-02-11T14:27:03+5:302021-02-11T14:38:06+5:30

Bhidewada memorial : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरु केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेची वास्तू असणारा भिडेवाडा स्मारकामध्ये रुपांतर करण्यासंदर्भातील बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.

"Department of Cultural Affairs should immediately form a committee regarding Bhidewada" - chhagan bhujbal | "भिडेवाडा वास्तु संदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने त्वरित समितीचे गठन करावे"

"भिडेवाडा वास्तु संदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने त्वरित समितीचे गठन करावे"

googlenewsNext
ठळक मुद्देसांस्कृतिक कार्य विभागामार्फत आवश्यक असणारी समिती नेमण्याबरोबरच येत्या 15 दिवसात याविषयाबाबत पुढील बैठक बोलवण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले.

मुंबई : पुण्यातील भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा येथे सुरु केली. या वास्तुचे संवर्धन करण्यासाठी ही वास्तु स्मारकामध्ये रुपांतरित करणे आवश्यक आहे. मात्र गेल्या दहा वर्षांपासून या प्रकरणात तोडगा निघाला नसल्याने सांस्कृतिक कार्य विभागाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समितीचे गठन करावे, अशी सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी गुरूवारी दिली आहे. (Bhidewada : Savitribai Phule and Mahatma Jyotiba Phule started the India's first school for girls in Bhidewada in Pune city in 1848)

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरु केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेची वास्तू असणारा भिडेवाडा स्मारकामध्ये रुपांतर करण्यासंदर्भातील बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, आमदार रोहित पवार, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून भूसंपादनाचे काम पाहणारे संबंधित अधिकारी यांच्यासह नगरविकास विभागाचे उपसचिव सतिश मोघे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची पुण्यातील भिडेवाडा ही वास्तु खाजगी मालकीची आहे. तसेच या वास्तुत राहणाऱ्यांनी भाडेकरुंनी दहा वर्षापूर्वी न्यायालयात धाव घेतल्याने सदर प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. याबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी त्वरित समिती नेमण्यात यावी. या समितीमध्ये नगरविकास, सांस्कृतिक कार्य आणि महसूल विभागाचे संबंधित अधिकारी यांच्यासह पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांचा समावेश असावा, असे छगन भुजबळ म्हणाले. तसेच, सदर समिती भिडेवाडा पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी काय करता येईल, तसेच याप्रकरणात न्यायालयाच्या बाहेर संमतीने काय करता येईल याबाबतची शक्यताही तपासण्यात यावी, अशी सूचना यावेळी छगन भुजबळ यांनी दिली आहे. 

येत्या 15 दिवसात पुन्हा बैठक बोलविणार - अमित देशमुख
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आवश्यक असणारी समिती नेमण्याबरोबरच येत्या 15 दिवसात याविषयाबाबत पुढील बैठक बोलवण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच पुढील बैठकीसाठी संबंधित विभागांबरोबरच ॲडव्होकेट जनरल यांनाही बोलविण्यात येईल. फुले दाम्प्त्याने  भिडेवाडा येथे सुरु केलेल्या मुलींच्या शाळेची वास्तू सांस्कृतिक कार्य आणि पुरातत्व विभागामार्फत राज्य स्मारक म्हणून घोषित करण्यासंदर्भातही शासन सकारात्मक असल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले.
 

Web Title: "Department of Cultural Affairs should immediately form a committee regarding Bhidewada" - chhagan bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.