"डीकेड ऑफ महाराष्ट्र" कार्यक्रमात औद्योगिक क्षेत्रासमोरील आव्हानांवर चर्चा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 06:06 PM2021-05-27T18:06:36+5:302021-05-27T18:13:49+5:30

Decade of Maharashtra : कोविडमुळे औद्योगिक क्षेत्र मोठया आव्हानांना सामोरे जात आहे. प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याकरता उद्योग घटकांना शासनातर्फे काय विशेष प्रोत्साहने आहेत हे जाणून घेऊ शकतो.

The "Decade of Maharashtra" program will discuss the challenges facing the industrial sector | "डीकेड ऑफ महाराष्ट्र" कार्यक्रमात औद्योगिक क्षेत्रासमोरील आव्हानांवर चर्चा होणार

"डीकेड ऑफ महाराष्ट्र" कार्यक्रमात औद्योगिक क्षेत्रासमोरील आव्हानांवर चर्चा होणार

Next

लोकमत नॉलेज फोरम प्रस्तुत आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या सहयोगाने "डीकेड ऑफ महाराष्ट्र" या कार्यक्रमांतर्गत २८ मे रोजी सकाळी ११ वाजता औद्योगिक क्षेत्र, आव्हाने आणि संधी या विषयाशी निगडीत ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ पी. अनबलगन.

विदर्भ इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी, एसएमई चेंबर ऑफ इंडिया चे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, एमएसीसीआयए चे अध्यक्ष संतोष मंडलेचा,  हे मान्यवर या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.

कोविडमुळे औद्योगिक क्षेत्र मोठया आव्हानांना सामोरे जात आहे. हे सर्व केव्हा स्थिर होईल, आपण कधी यशाच्या शिखरावर पोहचू. महाराष्ट्र कायम अग्रगण्य राहील का? प्लस वन रणनीतीचा आपल्याला फायदा होऊ शकतो का? एसएमईना उत्पादन उपक्रम सुरु करण्यात आणि होणाऱ्या फायद्यात एमआयडीसी कशाप्रकारे प्रोत्साहित करत आहे? एमआयडीसी आणि सरकारने आजारी उद्योगांचे पुनरुज्जीवन आणि एमआयडीसी जमीनवरील बंद उद्योगांसाठी काय उपक्रम घेतले आहेत?  प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याकरता उद्योग घटकांना शासनातर्फे काय विशेष प्रोत्साहने आहेत हे जाणून घेऊ शकतो.

या अनेक मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी या https://live.goliveonweb.com/lokmatknowledgeforum/register.php लिंकवर नोंदणी करता येईल.
 
तारीख - २८ मे सकाळी ११.०० वाजता

नोंदणी साठी लिंक https://live.goliveonweb.com/lokmatknowledgeforum/register.php

 

Web Title: The "Decade of Maharashtra" program will discuss the challenges facing the industrial sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.