The death of 'that' old man is not due to Corona; Inspection Report 'Negative' | बुलडाणा : ‘त्या’ वृद्धाचा मृत्यू कोरोनामुळे नाही; तपासणी अहवाल ’निगेटिव्ह’

बुलडाणा : ‘त्या’ वृद्धाचा मृत्यू कोरोनामुळे नाही; तपासणी अहवाल ’निगेटिव्ह’

ठळक मुद्देतपासणी प्रयोगशाळेचा अहवाल कोरोना बाबत ‘निगेटिव्ह’ आला आहे. ना कोरोनाची लागन झाली नव्हती, असे डॉक्टर प्रेमचंद पंडित यांनी सांगितले.

बुलडाणा : कोरोनासदृश लक्षणे आढळून आल्यानंतर शनिवारी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दगावलेल्या वृद्धाचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला नसल्याचे रविवारी प्राप्त झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. सदर वृद्धाचा नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू तपासणी प्रयोगशाळेचा अहवाल कोरोना बाबत ‘निगेटिव्ह’ आला आहे. त्यामुळे बुलडाणा  जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही,असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित यांनी स्पष्ट केले. शनिवारी सौदी अरेबियातून आलेल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
सदर वृद्ध हे चिखली तालुक्यातील असून, ते शुक्रवारी सौदी अरेबिया येथून परत आले होते. ताप आणि सर्दीची लक्षणे आढळल्यामुळे त्यांना आधी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु कोरोनासदृश लक्षणे आढळल्यामुळे त्यांना शनिवारी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात खबरदारीच्या दृष्टिकोनातून ठेवण्यात आले होते. सदर वृद्ध व्यक्तीस आधीपासूनच मधुमेह व इतर आजार असल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना, सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या रुग्णाचे नमुने हे नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आले होते. रविवारी या रुग्णाच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यांना कोरोनाची लागन झाली नव्हती, असे त्या अहवालात नमुद असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित यांनी सांगितले.

 

Web Title: The death of 'that' old man is not due to Corona; Inspection Report 'Negative'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.