A day of fast-moving events in the politics of Maharashtra | महाराष्ट्राच्या राजकारणातील वेगवान घडामोडींचा दिवस
महाराष्ट्राच्या राजकारणातील वेगवान घडामोडींचा दिवस

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी रविवारी संध्याकाळी सरकार स्थापन करण्याकरिता शिवसेनेला निमंत्रण दिल्यानंतर सोमवारी सकाळपासून रात्रीपर्यंत महाराष्ट्रात मिनिटामिनिटाला प्रचंड उत्सुकता वाढविणाऱ्या वेगवान राजकीय घडामोडी घडत गेल्या त्यावर नजर...

07.40 AM  दिल्ली : शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा; ट्विटरवरून दिली माहिती
09.00 AM  सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने शिवसेनेच्या हालचाली सुरू; मालाड परिसरातील हॉटेल द रिट्रीटमध्ये आमदारांची बैठक
09.25 AM  भाजप सत्ता स्थापन करू शकला नाही याचे खापर शिवसेनेवर फोडणे अयोग्य - संजय राऊत
12.15 PM महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेविषयी काँग्रेस सायंकाळी ४ वाजता राज्यातील नेत्यांशी चर्चा करणार : मल्लिकार्जुन खर्गे
12.35 PM राज्यातील सत्तास्थापनेविषयी दोन्ही काँग्रेस पक्ष सायंकाळी एकमताने निर्णय घेणार - नवाब मलिक, राष्ट्रवादी प्रवक्ता
12.40 PM शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची मंत्रिपद सोडल्यानंतर भाजपवर टीका
01.20 PM शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत मागितला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा
04.10 PM दिल्लीत सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, राजीव सातव, मुकुल वासनिक यांच्यासह महाराष्ट्रातील नेते उपस्थित. राजस्थानातूनही नेत्यांना पाचारण
04.15 PM भाजपला समर्थन देणारे अपक्ष शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा
04.20 PM शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात फोनवरून चर्चा
04.25 PM भाजप कोअर कमिटीची बैठक; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील वर्षा बंगल्यावर दाखल
04.30 PM शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्या फोननंतर पुन्हा काँग्रेसची चर्चा
05.05 PM शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेस तयार नसल्याचे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे. मनधरणी सुरू
05.15 PM शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा
05.20 PM शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे राज्यपालांची भेट घेण्यासाठी रवाना
05.25 PM शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनिया गांधी यांच्या निर्णयाची प्रतीक्षा
05.30 PM शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पत्र तयार असल्याची चर्चा
05.40 PM शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक सुरूच
05.50 PM शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस तयार असल्याचा काही नेत्यांचा दावा
06.05 PM उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असल्याच्या अपेक्षेने शिवसेना आमदारांच्या प्रतिक्रिया
06.10 PM काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र मिळाल्याचा त्या पक्षाच्या नेत्यांचा दावा
06.40 PM एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य शिवसेना नेते आणि काही अपक्ष आमदार राजभवनात. काँग्रेसच्या पत्राची प्रतीक्षा
06.55 PM शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला शपथविधी होणार असल्याचे तर्क लढवण्यास सुरुवात
07.20 PM काँग्रेस पाठिंब्याचे पत्र शिवसेनेला न मिळाल्याचे जवळपास स्पष्ट
07.25 PM काँग्रेसचे प्रसिद्धीपत्रक; शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत उल्लेख नाही, राष्ट्रवादीशी चर्चा करणार असल्याचा संदर्भ
07.31 PM सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी शिवसेनेला दिलेली मुदत संपली
07.40 PM राज्यपालांनी वाढीव वेळ नाकारली. मात्र, शिवसेनेचा दावा कायम राहणार - आदित्य ठाकरे
07.45 PM शरद पवार यांच्याशी चर्चा करून सोनिया गांधी रणनीती ठरवणार - पृथ्वीराज चव्हाण
08.25 PM राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांचे सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण
08.55 PM राज्यपालांच्या निमंत्रणानंतर राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ राज्यपालांकडे रवाना. काँग्रेसशी चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याची दिली माहिती
09.25 PM राज्यपालांनी आम्हांला २४ तासांची मुदत दिली आहे - जयंत पाटील. त्यानंतर पक्षाच्या नेत्यांची पुन्हा शरद पवारांशी चर्चा
10.30 PM मातोश्री बंगल्यावर शिवसेना नेत्यांची बैठक
10.50 PM शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवर चर्चा

Web Title: A day of fast-moving events in the politics of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.