जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू; जमावाकडून गाडीची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 11:01 AM2019-09-30T11:01:58+5:302019-09-30T12:51:56+5:30

बार्शी तालुक्यातील शेलगावमध्ये गाडीला अपघात

crowd vandalised water conservation minister maharashtra tanaji sawant car after it hits one youth | जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू; जमावाकडून गाडीची तोडफोड

जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू; जमावाकडून गाडीची तोडफोड

googlenewsNext

सोलापूर: जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने एका व्यक्तीला उडवल्याची घटना सोलापुरात घडली आहे. यानंतर संतप्त जमावानं सावंत यांच्या गाडीची तोडफोड केली. अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील शेलगावमध्ये हा अपघात झाला. अपघातावेळी तानाजी सावंत गाडीमध्ये नव्हते, अशी माहिती मिळत आहे.



तानाजी सावंत यांचे नातेवाईक प्रवास करत असलेल्या फॉर्च्युनर कारनं दुचाकीला धडक दिली. बार्शी-लातूर बायपास रोडवरील बीआयटी महाविद्यालयाजवळ असलेल्या शेळगाव फाटयाजवळ हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील शामकुमार देविदास व्हळे (वय 40 वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला. ते शेळगावचे रहिवासी होते. यानंतर संतप्त जमावानं सावंत यांच्या गाडीची तोडफोड केली. 

Web Title: crowd vandalised water conservation minister maharashtra tanaji sawant car after it hits one youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.