खेकड्यांमुळे धरण फुटले; मंत्र्यांचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 03:43 AM2019-07-05T03:43:11+5:302019-07-05T03:44:15+5:30

तिवरे धरणाचे काम शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने केले आहे.

crabs break dam; Ministers of Awesome Claims | खेकड्यांमुळे धरण फुटले; मंत्र्यांचा अजब दावा

खेकड्यांमुळे धरण फुटले; मंत्र्यांचा अजब दावा

Next

सोलापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणात खेकड्यांची फार मोठी अडचण आहे. त्यातूनच धरणाला गळती लागली, असा अजब दावा करत काही गोष्टी विधीलिखीत असतात. त्यामुळे शिवसेनेच्या आमदाराला दोष देणे योग्य होणार नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी गुरुवारी येथे दिले.
तिवरे धरणाचे काम शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने केले आहे. या कामाबाबत स्वत: जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी साशंकता व्यक्त करत कालच्या दुर्घटनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. याबद्दल सावंत म्हणाले, २००२ ला हे धरण पूर्ण झाले. आज १५ वर्षे त्या ठिकाणी पाणी साठते. आत्तापर्यंत काहीच झाले. मात्र अलीकडच्या काळात या धरणात खेकड्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर झाली. त्यातून गळती झाल्याचे निदर्शनास आले. ही गळती बंद करण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले होते.
परंतु आठ तासात १९२ मि.मी. पाऊस झाला. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की ती ढगफुटी होती. काही गोष्टी विधी लिखीत असतात, असेही ते म्हणाले.
धरणाची दुरुस्ती निष्कृष्ट होती का, असे विचारले असता सावंत म्हणाले, दुरुस्ती निकृष्ट होती का हे पाणी साठल्यानंतरच कळेल. अधिकाºयांनी आपले काम केले. पण ते उपयुक्त झाले नसावे. अचानक पाण्याची पातळी वाढली. ठेकेदाराने २००४ साली काम केले होते. आता त्याचा विषय कुठे आला? असा सवालही सावंत यांनी केला.

Web Title: crabs break dam; Ministers of Awesome Claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.