Coronavirus: ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबत होणार फेरविचार? आज निर्णयाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 07:30 AM2021-11-29T07:30:07+5:302021-11-29T07:31:46+5:30

Coronavirus In Maharashtra : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत पाठविण्याविषयी पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाची बैठक सोमवारी होणार असून या संबंधित अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Coronavirus: Will there be a rethink about starting school? | Coronavirus: ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबत होणार फेरविचार? आज निर्णयाची शक्यता

Coronavirus: ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबत होणार फेरविचार? आज निर्णयाची शक्यता

Next

मुंबई : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत पाठविण्याविषयी पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाची बैठक सोमवारी होणार असून या संबंधित अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्या आधी आरोग्य विभागाच्या आरोग्यसेवा संचालनालयाकडून शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना मात्र जारी करण्यात आल्या आहेत.

राज्यभरातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवा संचालनालयाकडून जिल्हापरिषद, महापालिका, नगरपालिका स्तरावर या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यात दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फूट अंतर, शाळेत मास्क घालणे बंधनकारक, वैयक्तिक आणि शाळेत स्वच्छता, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे, बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करू नये, शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम, खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात. ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती असावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.

क्वारंटाईन विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी आणि शाळेतील एकाच वर्गातील पाचपेक्षा अधिक मुले दोन आठवड्याच्या कालावधीत कोरोना बाधित आढळल्यास शाळेतील कोविड प्रतिबंधक कृती योजनेचा आढावा घ्यावा असेही नमूद करण्यात आले आहे. याशिवाय मुलांच्या व शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन नैराश्य, तणाव निर्माण होऊ शकतो यासाठी समुपदेशनाची व्यवस्था करण्याच्या सूचनाही शाळांना करण्यात आल्या आहेत.

Read in English

Web Title: Coronavirus: Will there be a rethink about starting school?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.