Coronavirus : टेस्टिंग किट ही पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 05:56 AM2020-03-20T05:56:05+5:302020-03-20T05:56:20+5:30

विषाणू हा एच प्रथिनांचा समूह असल्यामुळे शरीराबाहेर जिवंत राहू शकत नाही. त्यासाठी मानवी पेशींची गरज लागते.

Coronavirus: Testing Kit is a polymerase chain reaction | Coronavirus : टेस्टिंग किट ही पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन

Coronavirus : टेस्टिंग किट ही पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन

Next

विषाणू म्हणजे काय? शरीरात प्रवेश केल्यानंतर वाढ कशी होते?
विषाणू हा एच प्रथिनांचा समूह असल्यामुळे शरीराबाहेर जिवंत राहू शकत नाही. त्यासाठी मानवी पेशींची गरज लागते. कोणताही विषाणू शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करून पेशींच्या कार्यात बाधा आणतो.

रॅन्डम टेस्टिंगमध्ये धोका आहे?
रॅन्डम टेस्टिंग करण्याचा मूळ उद्देश सामान्य जनतेत संक्रमण आहे किंवा नाही याची तपासणी करणे हा आहे. त्यामुळे ही तपासणी कमी प्रमाणात आहे. आतापर्यंत देशातील विविध प्रयोगशाळांमध्ये केलेल्या नमुन्यांच्या तपासणीमध्ये सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सध्याचे संक्रमण केवळ परदेशातून आलेले प्रवासी व त्यांच्या संपर्कातील लोकांमध्ये आढळून आले आहे.

टेस्टिंग किट काय असते?
टेस्टिंग किट ही पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन (पीसीआर) पद्धतीची आहे. यामध्ये विषाणूचे ‘आरएनए’ रिप्लिकेट केला जातो. डीएनए व आरएनए मिळाला की तो वृद्धिंगत केला जातो. त्यावरून तो कुठल्या प्रकारचा आहे, हे कळते. त्यासाठी लागणारे रिएजंट्स भारतात उपलब्ध आहेत. प्रायमर व प्रोब्स ही रसायने आहे. रुग्णाच्या नमुन्यामध्ये विषाणूचे अस्तित्व आहे की नाही, हे शोधण्यासाठी प्रोब्सचा वापर होतो. तर प्रायमर त्यासाठी साहाय्य करते.

कोरोना निश्चितीसाठी एका नमुन्याची किती वेळा तपासणी करावी लागते?
एका नमुन्याची एकदा तपासणी केली जाते. गरज असल्यास पुन्हा तपासणी केली जाते. एका तपासणीसाठी ४ ते ६ तासांचा कालावधी लागतो.

तपासणीसाठी खर्च किती?
एकावेळी १५०० रुपये खर्च येतो. अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी केल्यास ३ हजार खर्च होतो.

तपासणीची प्रक्रिया कशी होते?
स्वॅब (घशातील द्रव) घेऊन प्रयोगशाळेकडे दिला जातो. प्रथम प्रक्रिया करून ‘आरएनए’ विलग केला जातो. त्यानंतर पीसीआर प्रक्रियेसाठी वापर होतो. वद्धींगत ‘आरएनए’ कुठला आहे याची तपासणी होते. त्यानंतर‘सिक्वेन्स मॅच’ करून अहवाल केला जातो.

Web Title: Coronavirus: Testing Kit is a polymerase chain reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.