Coronavirus:...तर कोरोनापूर्वी भूकेनेच गरीबांचा बळी जाईल; ‘लॉकडाऊन’मुळे उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 04:19 PM2020-03-25T16:19:17+5:302020-03-25T16:30:59+5:30

मोखाडा सारख्या दुर्गम भागात रोजगार हमी हा एकमेव रोजगार पर्याय आहे. तरीही 2020 वर्षातील तब्बल 14 कोटी 14 लाख 65 हजार 51 रुपये इतकी मजुरी व इतर देयक रक्कम थकीत असल्याची धक्कादायक महिती पंडित यांनी दिली आहे

Coronavirus:... So before the coronas, starvation will only kill the poor; Hunger time due to 'lockdown' pnm | Coronavirus:...तर कोरोनापूर्वी भूकेनेच गरीबांचा बळी जाईल; ‘लॉकडाऊन’मुळे उपासमारीची वेळ

Coronavirus:...तर कोरोनापूर्वी भूकेनेच गरीबांचा बळी जाईल; ‘लॉकडाऊन’मुळे उपासमारीची वेळ

Next

मोखाडा - जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे, संसर्ग होऊ नये म्हणून वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सूरु आहेत, केंद्र सरकारने 21 दिवसाचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ही योग्य पाऊल असलं तरी लॉकडाऊन काळात हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या जगण्याचा विचार व्हायला हवा असं मत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित व्यक्त केलं आहे.

मोखाडा सारख्या दुर्गम भागात रोजगार हमी हा एकमेव रोजगार पर्याय आहे, तरीही 2020 वर्षातील तब्बल 14 कोटी 14 लाख 65 हजार 51 रुपये इतकी मजुरी व इतर देयक रक्कम थकीत असल्याची धक्कादायक महिती पंडित यांनी दिली आहे. यामुळे गावात असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे, कोरोना या दुर्गम भागात पोहचेपर्यंत हे मजूर भूकबळी जातील असेही ते म्हणाले. याबाबत तातडीने निर्णय घेऊन ही रक्कम मजुरांच्या खात्यात वर्ग करावी अशी मागणी त्यांनी केली.

तसेच याबाबत संबंधित अधिकारी तसेच रोजगार हमीचे आयुक्त रंगा नायक यांच्यासोबत विवेक पंडित यांचे बोलणे झाले, ही रक्कम थकीत असणे म्हणजे भुकेल्या मजूरांना आणि त्यांच्या निष्पाप बालकांना मृत्यूच्या मुखात ढकलण्यासारखे आहे. त्यामुळे तातडीने याबाबत पावलं उचलावी असं पंडित म्हणाले. मोखाडासारख्या ग्रामीण भागात अशी परिस्थिती नसून राज्यभरात अनेक दुर्गम भागात हेच सुरु आहे. राज्यभरात थकबाकी असल्याचं अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात शासनाने हातावर पोट असणाऱ्या गरिबांच्या कुटुंबाचा विचार करून धोरण आखायला हवं त्याचसोबत ही मजुरी तातडीने वर्ग व्हावी अशी आग्रही मागणी पंडित यांनी सरकारकडे केली.

Web Title: Coronavirus:... So before the coronas, starvation will only kill the poor; Hunger time due to 'lockdown' pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.