शुभसंकेत : राज्यात रुग्णांचा आकडा घटला ५ हजारांनी; जागतिक रुग्णसंख्येत महाराष्ट्र चौथ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 03:30 AM2020-09-15T03:30:32+5:302020-09-15T06:48:49+5:30

दिलासादायक बाब म्हणजे गेले काही दिवस रोज २० हजारांवर नव्या रुग्णांची भर पडत असताना आज हा आकडा पाच हजारांनी कमी झाला.

CoronaVirus News : The number of patients in the state decreased by 5,000; Maharashtra ranks fourth in the world in the number of patients | शुभसंकेत : राज्यात रुग्णांचा आकडा घटला ५ हजारांनी; जागतिक रुग्णसंख्येत महाराष्ट्र चौथ्या स्थानी

शुभसंकेत : राज्यात रुग्णांचा आकडा घटला ५ हजारांनी; जागतिक रुग्णसंख्येत महाराष्ट्र चौथ्या स्थानी

Next

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सोमवारी दिवसभरात १७ हजार ६६ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्येत महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानी आला आहे. राज्यभरात बाधितांची संख्या १० लाख ७७ हजार ३७४ वर तर मृतांचा आकडा २९ हजार ८९४ झाला आहे.
दिलासादायक बाब म्हणजे गेले काही दिवस रोज २० हजारांवर नव्या रुग्णांची भर पडत असताना आज हा आकडा पाच हजारांनी कमी झाला. चोवीस तासांत १५ हजार ७३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.१६ टक्के झाले असून मृत्युदर २.७७ टक्के आहे. सध्या राज्यात २ लाख ९१ हजार २५६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ७ लाख ५५ हजार ८५० रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

टॉप फाइव्ह
अमेरिका : ६७१३२८६
भारत : ४८७३०४२
ब्राझील : ४३३०४५५
महाराष्टÑ : १०७७३७४
पेरू : ७२९६१९

Web Title: CoronaVirus News : The number of patients in the state decreased by 5,000; Maharashtra ranks fourth in the world in the number of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.