CoronaVirus News : राज्यात कोरोनाचे तीन लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण; दिवसभरात ३९८ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 02:56 AM2020-09-18T02:56:29+5:302020-09-18T03:07:03+5:30

सध्या ३ लाख १ हजार ७५२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९० टक्के असून मृत्युदर २.७४ टक्के आहे.

CoronaVirus News: More than three lakh active corona patients in the state; 398 deaths in a day | CoronaVirus News : राज्यात कोरोनाचे तीन लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण; दिवसभरात ३९८ मृत्यू

CoronaVirus News : राज्यात कोरोनाचे तीन लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण; दिवसभरात ३९८ मृत्यू

googlenewsNext

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख वाढत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी दिवसभरात तब्बल २४,६१९ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून मृतांचा आकडा ३९८ वर पोहोचला आहे. परिणामी, एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११ लाख ४५ हजार ८४० झाली असून मृतांचा आकडा ३१,३५१ आहे.
सध्या ३ लाख १ हजार ७५२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९० टक्के असून मृत्युदर २.७४ टक्के आहे. दिवसभरात १९,५२२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत राज्यातील एकूण ८ लाख १२ हजार ३५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
दिवसभरातील ३९८ मृत्यूंमध्ये मुंबई ४३, ठाणे ७, ठाणे मनपा २, नवी मुंबई मनपा ७, कल्याण-डोंबिवली मनपा २, उल्हासनगर मनपा १, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा-भार्इंदर मनपा ७, पालघर ११, वसई-विरार मनपा ४, रायगड ७ आदी रुग्णांचा समावेश आहे. राज्यात पुण्यात सर्वाधिक ८१,५४० सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ५५ दिवसांवर
मुंबईत गुरुवारी दिवसभरात २,४११ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ४३ मृत्यू झाले. परिणामी, शहर उपनगरातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ७८ हजार ३८५ वर पोहोचली असून बळींचा आकडा ८ हजार ३२३ आहे. आतापर्यंत १ लाख ३६ हजार ७३६ रुग्ण कोविडमुक्त झाले असून सध्या ३२,९५९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ७७ टक्के असून रुग्णदुपटीचा कालावधी ५५ दिवसांवर आला आहे.

Web Title: CoronaVirus News: More than three lakh active corona patients in the state; 398 deaths in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.