CoronaViru News: धक्कादायक! राज्यात आतापर्यंत 18 हजारहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 186 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 08:11 PM2020-09-12T20:11:21+5:302020-09-12T20:16:47+5:30

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. येथे आतापर्यंत 10 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, कोरोनाचा सर्वाधिक धोका, सर्व सामान्य जनतेच्या सेवेत असलेल्या पोलिसांना आहे. 

CoronaVirus News Maharashtra More than 18,000 police personnel infected with coronavirus 186 die | CoronaViru News: धक्कादायक! राज्यात आतापर्यंत 18 हजारहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 186 जणांचा मृत्यू

CoronaViru News: धक्कादायक! राज्यात आतापर्यंत 18 हजारहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 186 जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र पोलीसने शनिवारी एक अहवाल जारी केला. आतापर्यंत राज्यात तब्बल 18 हजार 890 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.3 हजार 729 जणांवर उपचार सुरू आहेत.

मुंबई - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाउन शिथील केल्यानंतर, कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. येथे आतापर्यंत 10 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, कोरोनाचा सर्वाधिक धोका, सर्व सामान्य जनतेच्या सेवेत असलेल्या पोलिसांना आहे. 

महाराष्ट्र पोलीसने शनिवारी एक अहवाल जारी केला. यानुसार, आतापर्यंत राज्यात तब्बल 18 हजार 890 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, यांपैकी 14 हजार 975 कर्मचारी बरेही झाले आहेत. 3 हजार 729 जणांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोना व्हायरसमुळे 186 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 46.50 लाखांवर -
गेल्या 24 तासांत देशात तब्बल 97,570 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यानंतर आता शनिवारी एकून कोरोना संक्रमितांचा आकडा वाढून तब्बल 46 लाखांवर गेला आहे. तर आतापर्यंत 36,24,196 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरना रुग्ण बरे होण्याचा दर आता 77.77 टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता देशातील कोरना संक्रमितांचा आकडा 46,59,984 वर पोहोचला आहे. तर, गेल्या 24 तासांत 1,201 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत तब्बल 77,472 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील लॉकडाउन संपल्यानंतर, कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जगभरातील नव्या रुग्णांचा विचार करता, भारतातच सर्वाधिक नवे रुग्ण समोर येत आहेत. एकूण कोरोना संक्रमितांच्या संख्येचा विचार करता भारताने आता ब्राझीललाही मागे टाकले आहे. तसेच अमेरिका आणि भारतातील संख्येतील तफावतही सातत्याने कमी होताना दिसत आहे.

सुट्टीच्या नियमांत बदल, मुंबईतील डॉक्टर्सनी दर्शवला विरोध -
कोरोना रुग्णांवर उपचार करत असलेल्या मुंबईतील निवासी डॉक्टरांनी सुट्टीच्या नियमांत करण्यात आलेल्या बदलांना विरोध दर्शवला आहे. या डॉक्टरांनी शनिवारी काळी पट्टी लाऊन काम करायला सुरुवात केली आहे. राज्य सरकारने कोरोना रुग्णांवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांना आठवड्यातून एक दिवसच सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. 

भारत अमेरिकेला महिनाभरात मागे टाकणार?
आता भारतात कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला आहे. या साथीचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या क्रमांकावर भारत आला आहे. अमेरिका आणि भारताच्या रुग्णसंख्येत २० लाखांचा फरक आहे. भारतात याच वेगाने कोरोना रुग्ण वाढत राहिले, तर 20 दिवस ते महिनाभरात अमेरिकेला मागे टाकत, भारत सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचा देश बनेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या देशात 9,43,480 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या 20.68 टक्के आहे. सलग दोन दिवस कोरोनाचे 95 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

CNG, PNG डिस्ट्रिब्यूटर होण्याची संधी, मोदी सरकार देणार लायसन्स

कोरोना व्हायरस : "जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं"; पंतप्रधान मोदींनी दिला सावधगिरीचा इशारा

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

कमावण्याची संधी : 'या' IPOमध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, फक्त 3 तासांतच सुपरहिट!

'या' दोन सरकारी बँकांच्या ग्राहकांसाठी भारी गिफ्ट, एकाच वेळी घेतला मोठा निर्णय

Web Title: CoronaVirus News Maharashtra More than 18,000 police personnel infected with coronavirus 186 die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.