Coronavirus: "कोरोना संकटात उद्धव ठाकरे घराबाहेर पडतच नाहीत, शपथविधीला मात्र सहकुटुंब गेले"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 08:46 PM2020-05-19T20:46:17+5:302020-05-19T20:50:35+5:30

''शेतकऱ्यांना वाचवणार, कर्जमाफी देणार, चिंतामुक्त करणार अशा घोषणा करणारं सरकार शेतकऱ्यांकडे बघायलाही तयार नाही''- गिरीश महाजन

Coronavirus News: Girish Mahajan targets CM Uddhav Thackeray Maharashtra Government ajg | Coronavirus: "कोरोना संकटात उद्धव ठाकरे घराबाहेर पडतच नाहीत, शपथविधीला मात्र सहकुटुंब गेले"

Coronavirus: "कोरोना संकटात उद्धव ठाकरे घराबाहेर पडतच नाहीत, शपथविधीला मात्र सहकुटुंब गेले"

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य सरकार कोरोना संकट हाताळण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीका भाजपाकडून करण्यात येत आहे. सरकारच्या निष्क्रियतेविरोधात प्रदेश भाजपानं 'महाराष्ट्र बचाओ' अभियानाची घोषणाही केलीय. माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा दररोज वाढणारा आकडा सगळ्यांचीच काळजी वाढवतोय. सोमवारी राज्यातील कोरोनारुग्णांच्या संख्येनं ३५ हजारांचा टप्पा ओलांडलाय. संसर्गाचा हा वेग लक्षात घेऊनच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन-४ जाहीर केलाय, पण तरीही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होतेय. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार कोरोना संकट हाताळण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीका भाजपाकडून करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांना भेटून, सरकारच्या कामगिरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच, प्रदेश भाजपानं 'महाराष्ट्र बचाओ' अभियानाची घोषणाही केलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात शाब्दिक चकमक रंगण्याची चिन्हं दिसत असतानाच, माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदी कायम राहिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र, राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ज्या पद्धतीने काम व्हायला हवे, तसे होताना दिसत नाही. मुख्यमंत्री तर घराच्या बाहेर निघत नाहीत. विधानपरिषद सदस्यत्वाच्या शपथविधीसाठी ते सहकुटुंब बाहेर पडल्याचं पाहिलं. पण, कोरोनाशी संबंधित मीटिंगसाठी किंवा कुठल्या अडचणींबाबत ते कुणालाही भेटत नाहीत, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.

ठाकरे सरकारचं मंत्रिमंडळही घरात बसून आहे. रस्त्यावर कुणी येत नाही. कुणी हॉस्पिटलला जाताना दिसत नाही की कोरोना वॉरियर्सचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत नाही. नुसतेच घरात बसून बाईट दिले जात आहेत. सरकारच्या कुठल्याच खात्यात समन्वय नाही, केंद्राच्या पॅकेजचा फायदा घेण्यातही ते अपयशी ठरलेत, असं टीकास्त्र त्यांनी सोडलं.

महाराष्ट्रातील आकडा आत्तापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट वाढू शकतो. त्यात पावसाळा येतोय. मुंबई, पुण्यात परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी, रुग्णांना कसा दिलासा देणार?, त्यांच्यावर कसे उपचार करणार?, हे सरकारने सांगावं. अजूनही वेळ गेलेली नाही, लवकरात लवकर उपाययोजना केल्यास निश्चित फायदा होऊ शकतो, असंही महाजन यांनी नमूद केलं. विरोधी पक्षाने सहकार्याची भूमिका घेतलीय, पण सरकारकडून प्रतिसादच मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

गिरीश महाजन यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. कोरोना संकटाचा मुकाबला करणाऱ्या जळगावकरांच्या मागण्यांचं निवेदन त्यांनी सादर केलं. त्यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना वाचवणार, कर्जमाफी देणार, चिंतामुक्त करणार अशा घोषणा केल्या. पण आज त्यांचं सरकार शेतकऱ्यांकडे बघायलाही तयार नाही, अशी चपराक त्यांनी लगावली.

हेही वाचाः

मोदींना पत्र लिहिणाऱ्या पवारांनी उद्धव ठाकरेंनाही पत्र पाठवावं; फडणवीसांचा टोला

कोरोनाला रोखण्यात राज्य सरकार अपयशी, राज्यपालांची भेट घेत भाजपाच्या शिष्टमंडळाचा आरोप

कोरोना इतक्या लवकर हद्दपार होणार नाही, शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांना काही सूचना

...अन्यथा आपल्या ‘कोरोना योद्धे’ म्हणण्याला अर्थ नाही; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

... म्हणून मी लॉकडाऊन वाढवला, उद्धव ठाकरेंची नागरिकांना भावनिक साद

जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री ठाकरेंकडून मोदींचा खास उल्लेख; म्हणाले...

Web Title: Coronavirus News: Girish Mahajan targets CM Uddhav Thackeray Maharashtra Government ajg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.