CoronaVirus News : "पोलिसांसह केशकर्तन करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 05:18 AM2020-06-23T05:18:24+5:302020-06-23T05:18:30+5:30

कायद्याचे उल्लंघन असून बोराडे यांच्यासह डॉक्टर आणि पोलिसांवरही कारवाई करावी अशी मागणी सलून ब्यूटी पार्लर असोसिएशनने केली.

CoronaVirus News : "File a case against the hairdresser with the police" | CoronaVirus News : "पोलिसांसह केशकर्तन करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा"

CoronaVirus News : "पोलिसांसह केशकर्तन करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा"

Next

मुंबई : लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्यात आले तरी सलून चालकांना व्यवसायास परवानगी मिळालेली नाही. तरीही नियमांचे उल्लंघन करून डोंगरी परिसरात संतोष बोराडे हे पोलीस आणि डॉक्टरांचे केशकर्तन करत आहेत. हे कायद्याचे उल्लंघन असून बोराडे यांच्यासह डॉक्टर आणि पोलिसांवरही कारवाई करावी अशी मागणी सलून ब्यूटी पार्लर असोसिएशनने केली. यासंदर्भात मंगळवारी संघटनेची बैठक होणार आहे.
मुंबई सलून ब्यूटी पार्लर असोसिएशनचे सचिव प्रकाश चव्हाण यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या नियमानुसार, सलून बंदच आहेत. त्यामुळे अनेक सलूनचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
पुण्यात ज्यांनी सलून सुरू केले त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र, डोंगरी येथे संतोष बोराडे यांनी डोंगरी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांचे केशकर्तन आणि दाढी केली. मास्कही वापरले नव्हते. ही पोलिसांची सेवा असली तरी सलून चालविण्यास परवानगी नसताना
असे केशकर्तन करणे नियमविरोधात आहे. तसेच यावेळी बोराडे यांनी
किट घातले नाही ते धोकादायक
आहे. याप्रकरणी पोलीस, डॉक्टर यांच्यासह बोराडे यांच्यावर
कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.
सोयीने परवानगी आहे का?
मुंबईतील अनेक स्मशानभूमीत मृत्यूनंतरचे क्रियाकर्म केले जात आहे. पण सलून सुरू करण्यास परवानगी नाही. आपल्या गरजेनुसार नियम आहेत का? हा दुटप्पीपणा आहे, असे प्रकाश चव्हाण म्हणाले.
>सहा सलूनचालकांचे आत्महत्येचे पाऊल
राज्यात सलून बंद असल्याने सलून चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सहा जणांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असून त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. या सलूनचालकांच्या कुटुंबातील सदस्यांना १५ लाखांचे पॅकेज जाहीर करा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

Web Title: CoronaVirus News : "File a case against the hairdresser with the police"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.