CoronaVirus News : राज्यात दिवसभरात १४०८ कोरोनामुक्त; रुग्ण बरे होण्याचा सलग दुसऱ्या दिवशी उच्चांक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 02:41 AM2020-05-22T02:41:50+5:302020-05-22T06:28:43+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : गुरुवारी दिवसभरात ६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात ३६ पुरुष आणि २८ महिलांचा समावेश आहे. आजच्या ६४ मृत्यूपैकी ३१ जण हे ६० वर्षे किंवा त्यावरील आहेत.

CoronaVirus News: 1408 corona free in a day in the state; The patient's recovery peaked for the second day in a row | CoronaVirus News : राज्यात दिवसभरात १४०८ कोरोनामुक्त; रुग्ण बरे होण्याचा सलग दुसऱ्या दिवशी उच्चांक

CoronaVirus News : राज्यात दिवसभरात १४०८ कोरोनामुक्त; रुग्ण बरे होण्याचा सलग दुसऱ्या दिवशी उच्चांक

Next

मुंबई : राज्यात गुरुवारी २ हजार, ३४५ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून एकूण संख्या ४१ हजार, ६४२ झाली आहे. तर, कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येने सलग दुसºया दिवशी हजाराचा टप्पा ओलांडला. आज १ हजार, ४०८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे राज्यातील बरे झालेल्यांची एकूण संख्या ११ हजार ७२६ झाली आहे.
गुरुवारी दिवसभरात ६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात ३६ पुरुष आणि २८ महिलांचा समावेश आहे. आजच्या ६४ मृत्यूपैकी ३१ जण हे ६० वर्षे किंवा त्यावरील आहेत. तर २९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. चार जण ४० वर्षांखालील आहेत. या ६४ रुग्णांपैकी ३८ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. आजच्या ६४ मृत्यूमुळे एकूण मृतांची संख्या १ हजार ४५४ इतकी झाली आहे. आजच्या मृतांपैकी मुंबईमध्ये ४१, मालेगाव ९, पुण्यात ७, औरंगाबाद शहरात ३, नवी मुंबईमध्ये २, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर येथे प्रत्येकी एका मृत्यूची नोंद आहे.

5607नवे रुग्ण देशात
नवी दिल्ली : देशातील एकूण रुग्णांची संख्या गुरुवारी १ लाख १५ हजारांवर गेली. एका दिवसात ५६०७ नवे रुग्ण आढळल्याने आकडा खूपच वाढला. मात्र यापैकी ४६ हजार रुग्ण बरे झाले आहेत आणि सध्या ६३ हजार ६२४ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३५०२ जण मरण पावले आहेत. मृतांमध्ये ५० पेक्षा अधिक वयाचे आणि अन्य एखादा आजार असलेल्यांचे प्रमाण अधिक आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे.

पाच देशांतच दोन लाख मृत्यू
न्यू यॉर्क : जगात कोरोनाग्रस्तांची संख्या ५१ लाख ३१ हजारांवर गेली असून, मृतांचा आकडाही ३ लाख ३१ हजार झाला आहे. त्यापैकी ९५ हजार मृत्यू एकट्या अमेरिकेतील आहेत. अमेरिकेसह पाच देशांत मिळून कोरोनाने सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. ब्रिटन (३६ हजार), इटली (३२ हजार), फ्रान्स (२८ हजार) आणि स्पेन (२८ हजार) हे उर्वरित देश आहेत. रशियातील रुग्णांची संख्या ३ लाख १७ हजारांवर गेली असून, ३१०० लोक मरण पावले आहेत.

Web Title: CoronaVirus News: 1408 corona free in a day in the state; The patient's recovery peaked for the second day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.