Coronavirus: कोरोनाचे आणखी एक हजार मृत्यू लपविले; देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 01:30 AM2020-06-30T01:30:44+5:302020-06-30T01:31:04+5:30

वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ द्यावी. मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतर मुदतवाढ मिळालेली नाही. विदर्भ व मराठवाड्यातील मंत्र्यांनी याविषयी कॅबिनेटमध्ये आवाज उठवावा, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Coronavirus: Coronavirus hides another thousand deaths; Devendra Fadnavis accuses the government | Coronavirus: कोरोनाचे आणखी एक हजार मृत्यू लपविले; देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर आरोप

Coronavirus: कोरोनाचे आणखी एक हजार मृत्यू लपविले; देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर आरोप

Next

अमरावती/अकोला : कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते असून, राज्य सरकार मृत्यूंच्या आकड्यांची लपवाछपवी करत आहे. यापूर्वी सरकारने १,३२८ मृत्यू लपविले होते. ते जाहीर करावे लागले असून, आता आणखी १ हजार मृत्यू लपविल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सोमवारी त्यांनी अमरावती आणि अकोला जिल्ह्यात भेटी देऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण व सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात आहेत; मात्र राज्य सरकार गांभीर्याने काम करत नाही. कोरोनाशी लढाई करण्यापेक्षा हे सरकार आकड्यांशी खेळत आहे. सरकारने १ हजार मृत्यूंची लपवाछपवी केली असून, याबाबतची सविस्तर आकडेवारी आपण सरकारला कळविली आहे.

वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ द्यावी. मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतर मुदतवाढ मिळालेली नाही. विदर्भ व मराठवाड्यातील मंत्र्यांनी याविषयी कॅबिनेटमध्ये आवाज उठवावा, असेही फडणवीस यांनी सांगितले.

कर्जमाफी नाही अन् हमीनंतर कर्जही नाही
राज्य सरकारने केलेली कर्जमाफी ही फसवी निघाली. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही त्यांना आता नवे कर्ज मिळत नाही. सरकारने बँकांना हमी दिली असली तरी या हमीवर कर्जवाटप होत नाही, त्यामुळे बँकांनी सरकारचा आदेशच जुमानला नसल्याने शेतकºयांची फरफट होत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

Web Title: Coronavirus: Coronavirus hides another thousand deaths; Devendra Fadnavis accuses the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.