coronavirus: कोविड योद्ध्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भावूक पत्र, आभार मानत केले हे आवाहन...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 04:04 PM2020-05-23T16:04:05+5:302020-05-23T16:13:12+5:30

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कोविड योध्यांना एक भावूक पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड योद्ध्यांचे आभार मानले असून, शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे,  असे आवाहन केले आहे. 

coronavirus: CM Uddhav Thackeray's emotional letter to Kovid warriors BKP | coronavirus: कोविड योद्ध्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भावूक पत्र, आभार मानत केले हे आवाहन...

coronavirus: कोविड योद्ध्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भावूक पत्र, आभार मानत केले हे आवाहन...

Next
ठळक मुद्देशस्त्राने नाही तर सेवेने युद्ध जिंकण्याचे केले आवाहन पत्राद्वारे आवाहनमहाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्र्यांकडून आभार

 मुंबई -  कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे राज्यासमोरील आव्हान अधिकाधिक गंभीर झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील कोविड योद्धे कोरोनाला रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कोविड योध्यांना एक भावूक पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड योद्ध्यांचे आभार मानले असून, शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे,  असे आवाहन केले आहे. 

मुख्यमंत्री आपल्या पत्रात  म्हणतात की, ''आपल्या सर्वांना वैयक्तिक स्वरूपात पत्र लिहितांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी छाती अभिमानाने फुलून गेली आहे. हीच आपल्या महाराष्ट्राची आणि मराठी मातीची महान परंपरा आहे. संकटकाळात तो मागे हटत नाही. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याप्रमाणे कणखर होतो. आज आपण सगळेच कोरोनाच्या भीषण संकटाशी युद्ध करत आहोत. हे युद्ध साधे नाही. या युद्ध संकटात एक "सैनिक" बनून आपण कोविड योद्धा म्हणून मैदानात उतरला आहात. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झाला आहात, हे निश्चितच कौतूकास्पद आहे.

हे युद्ध सुद्धा सीमेवरील सैनिकांप्रमाणेच लढावे लागेल. महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक जणू आज एक सैनिक बनूनच संकटाचा मुकाबला करतांना दिसत आहे. आपणासारखे कोविड योद्धे आता युद्धात उतरल्याने मला मुख्यमंत्री म्हणून मोठे बळ  मिळाले आहे. ही एक प्रकारे देश आणि देवपुजाच आहे. हीच आपली संस्कृती आहे. शस्त्रापेक्षा ही मोहीम आपल्याला सेवेने जिंकायची आहे.  थोडक्यात सेवा हेच आपले शस्त्र राहील.  हा महाराष्ट्र, महाराष्ट्रातील जनता आपल्या रक्ताची आणि नात्याचीच आहे. महाराष्ट्राच्या हाकेला प्रतिसाद देत आपण पराक्रमाच्या परंपरेस जपत आहात. आपले आभार कसे मानवेत ?  ही सेवा महाराष्ट्राच्या व शिवरायांच्या चरणी रुजू झाल्याशिवाय राहणार नाही. 

परिचारिका, फार्मासिस्ट, डॉक्टर,  सामान्य स्वंयसेवक, सामाजिक कार्यकर्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, पॅरामेडिक, इतर वैद्यकीय व्यावसायिक, माहिती तंत्रज्ञानक्षेत्र, शिक्षक, संरक्षण सेवा, सुरक्षा रक्षक, सैन्य वैद्यकीय संस्थेतील लोक अशा विविध क्षेत्रातून मुंबईसह महाराष्ट्रात २१ हजार ७५२  लोकांनी "कोविड योद्धे" होण्यासाठी अर्ज केले आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 

Web Title: coronavirus: CM Uddhav Thackeray's emotional letter to Kovid warriors BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.