"देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय; आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 09:04 AM2021-03-26T09:04:29+5:302021-03-26T09:07:22+5:30

राज्यात सध्या 2 लाख 62 हजार 685 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 53 हजार 759 मृत्यूंची नोंद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांत महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा समावेश आहे.

Coronavirus Cases Prakash mehta request to devendra fadnavis over increasing of corona cases in Maharashtra | "देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय; आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा"

"देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय; आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा"

Next

मुंबई - कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा देशभरात थैमानन घालायला सुरुवात केली आहे. याचा सर्वाधिक फटका  महाराष्ट्राला बसत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्ण संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातच माजी मंत्री प्रकाश मेहता (Prakash mehta) यांनी ट्विटर आणि फेसबुकद्वारे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे, आता आपणच शासनाला मार्गदर्शन करावे, अशी विनंती केली आहे. (Coronavirus Cases : Prakash Mehta request to Devendra Fadnavis over increasing of corona cases in Maharashtra)

CoronaVirus News: ठाकरे सरकारनं कोरोना संकट योग्यपणे हाताळलं का?; राज्यातील जनता म्हणते...

प्रकाश मेहता यांची फेसबुक पोस्ट -
आपल्या ट्विट आणि फेसबुक पोस्टमध्ये मेहता यांनी म्हटले आहे, की "माननीय देवेंद्र फडणवीसजी, सप्रेम नमस्कार, कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात वाढला आहे. घाटकोपरमध्ये आज सर्वाधिक 327  रूग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. स्थानिक रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी जागा रिकाम्या नाहीत. परत पूर्ण लॉकडाऊन करायची वेळ येणार आहे की काय, असे वाटू लागले आहे. आता तर कित्येकांचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित असून एकाच रुग्णालयात उपचार घेताना आधळून येत आहेत. पती, पत्नी, मुलगा, सूनबाई एकाच रुग्णालयात पण वेगवेगळ्या वॉर्डमध्ये दाखल होताना दिसत आहेत. त्यामुळे हे सगळे वेळीच थांबवण्यासाठी तुम्ही कृपया सकारात्मक मार्ग निघेल यासाठी शासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे ही विनंती करतो."


माननीय Devendra Fadnavis जी, 

सप्रेम नमस्कार

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात वाढला आहे....

Posted by Prakash Mehta on Thursday, March 25, 2021

 

मराराष्ट्रातील कोरोना स्थिती -
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना विषाणूची महासाथ सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच बुधवारी राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात बुधवारपेक्षाही अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. गेल्या चोवीस तासांत राज्यात आजवरची सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत राज्यात 35 हजार 952 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दुसरीकडे थोडी दिलासादायक बाब म्हणजे 20 हजार 444 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. 

Coronavirus Update : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आजवरची सर्वाधिक नोंद; आढळले ३५,९५२ नवे कोरोनाबाधित 

आतापर्यंत 53 हजार 759 जणांचा मृत्यू -
राज्यात आतापर्यंत 26 लाख 833 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत 22 लाख 83 हजार 037 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात सध्या 2 लाख 62 हजार 685 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 53 हजार 759 मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 87.78 टक्के असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांत महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा समावेश आहे. 

Web Title: Coronavirus Cases Prakash mehta request to devendra fadnavis over increasing of corona cases in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.