Corona Vaccination: बूस्टर डोसनंतरही लसीचा डोस घ्यावाच लागणार; राज्याच्या टास्क फोर्स प्रमुखांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 08:49 AM2022-01-16T08:49:05+5:302022-01-16T08:51:20+5:30

राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, यापूर्वी  स्वाइन फ्लू, सार्स कोविड या आजारांतही विषाणूचे म्युटेशन होत राहते. त्याप्रमाणे कोविडच्या बाबतीतही दर सहा महिन्यांनी किंवा एक वर्षाने लस घ्यावी लागणार आहे.

Corona Vaccination Vaccine dose should be taken even after booster dose says expert | Corona Vaccination: बूस्टर डोसनंतरही लसीचा डोस घ्यावाच लागणार; राज्याच्या टास्क फोर्स प्रमुखांनी स्पष्टच सांगितलं

Corona Vaccination: बूस्टर डोसनंतरही लसीचा डोस घ्यावाच लागणार; राज्याच्या टास्क फोर्स प्रमुखांनी स्पष्टच सांगितलं

Next

मुंबई : देशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती होत आहे. या निमित्ताने वैद्यकीय तज्ज्ञांनी पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधक लस हे कोरोनाविरोधातील प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला प्राधान्य द्यावे, असे म्हटले आहे. या विषाणूत जनुकीय बदल होत असल्याने त्याप्रमाणे लसीमध्येही बदल होतील, असेही डॉक्टरांनी नमूद केले आहे.

राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, यापूर्वी  स्वाइन फ्लू, सार्स कोविड या आजारांतही विषाणूचे म्युटेशन होत राहते. त्याप्रमाणे कोविडच्या बाबतीतही दर सहा महिन्यांनी किंवा एक वर्षाने लस घ्यावी लागणार आहे. ज्या ठिकाणी या विषाणूचा प्रसार अधिक आहे किंवा जे घटक संसर्गाच्या दृष्टीने अतिजोखमीच्या गटात येतात अशा व्यक्तींना लसीकरणात प्राधान्य देण्यात येईल. आता कोरोनाची लाट आहे; परंतु ज्यावेळी एन्डेमिक म्हणजेच अंतर्जन्य आजार होईल, तेव्हा लसही बदलेल, जुनी लस उपयुक्त ठरणार नाही. राज्यात पहिल्या टप्प्यात चांगले लसीकरण झाले. लहानग्यांसाठी तोंडावाटे देण्यात येणारा लसीचा डोस आला तर त्यात आपण लगेच गती पकडू शकतो. बूस्टर डोसविषयी अजूनही सामान्यांची मानसिकता सकारात्मक नाही, कोरोना गेला आहे अशा भ्रमात सर्व आहेत. तसे न करता ही मात्रा घ्यायला हवी.

लसीनंतर कोरोना होण्याचा धोका मात्र...
लसीमुळे कोरोना होत नाही हा गैरसमज बाळगणे चुकीचे आहे. आता शास्त्रीय व वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे की, लसीकरणामुळे कोरोनाच्या आजाराची तीव्रता कमी होते. रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासत नाही किवा गंभीर स्वरूप घेत नाही, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

थोडा विलंबच
राज्यात लसीकरण मोहिमेच्या प्रत्येक टप्प्याला संमती मिळण्यासाठी काहीसा उशीरच झाला आहे. त्यामुळे ज्या तुलनेत लसीकरणाने वेग धरावा त्या तुलनेत आपल्याला यश मिळाले नाही. समाजात जास्तीत जास्त लसीकरणाला प्राधान्य द्यावे याकरिता लस साक्षरता गरजेचे असल्याचे या निमित्ताने दिसून आले. त्यामुळे यंत्रणांनी त्यावर काम करायला हवे.- डॉ. अविनाश भोंडवे, राष्ट्रीय अधिष्ठाता इंडियन मेडिकल असोसिएशन कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्स 

राज्यातील आकडेवारी
एकूण लसीकरण १४ कोटी २५ लाख ३१ हजार ५९२ 
पहिला डोस ८ कोटी ४५ लाख ४७ हजार ११८
दुसरा डोस ५ कोटी ७७ लाख १५ हजार ६०४

लसीकरण मोहिमेचा खूप सकारात्मक फायदा झाला आहे. तिसरी लाट किंवा कोरोनाचे डेल्टा, ओमायक्रॉन व्हेरिएंटशी लढण्यासाठी लसच फायदेशीर ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. दैनंदिन रुग्णांमध्ये वाढ होत असली तरीही यातील ९० टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका प्रशासन 

Read in English

Web Title: Corona Vaccination Vaccine dose should be taken even after booster dose says expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.