Corona Vaccination : आतापर्यंत २ कोटी ४१ लाख जणांचे लसीकरण, आरोग्य विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 05:59 AM2021-06-08T05:59:21+5:302021-06-08T05:59:43+5:30

Corona Vaccination : राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १६ लाख ९८ हजार ६२४ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस, तर २५ हजार ३९० लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

Corona Vaccination: So far 2 crore 41 lakh people have been vaccinated, according to the health department | Corona Vaccination : आतापर्यंत २ कोटी ४१ लाख जणांचे लसीकरण, आरोग्य विभागाची माहिती

Corona Vaccination : आतापर्यंत २ कोटी ४१ लाख जणांचे लसीकरण, आरोग्य विभागाची माहिती

Next

मुंबई :  राज्यात रविवारी ८९ हजार ९१६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण २ कोटी ४१ लाख १६ हजार ६५ लाभार्थ्यांचे लसीकरण कऱण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १६ लाख ९८ हजार ६२४ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस, तर २५ हजार ३९० लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ४५ लाख ५८ हजार ९२५ लाभार्थ्यांना लसीचा पहिला, तर ३२ लाख २० हजार ६७२ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.
राज्यात १२ लाख ३ हजार ३२८ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, ७ लाख ४७ हजार ९२० आराेग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १८ लाख ७० हजार ७१२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस, तर ७ लाख ९० हजार ४९४ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. 

Web Title: Corona Vaccination: So far 2 crore 41 lakh people have been vaccinated, according to the health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.