Cornavirus: दिलासादायक! 'हा' जिल्हा झाला कोरोनामुक्त; प्रशासनाने केले जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 10:51 AM2020-04-20T10:51:13+5:302020-04-20T17:33:58+5:30

महाराष्ट्रात ५५२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची  रविवारी नोंद झाली.

Cornavirus: Osmanabad district has been coronavs free mac | Cornavirus: दिलासादायक! 'हा' जिल्हा झाला कोरोनामुक्त; प्रशासनाने केले जाहीर

Cornavirus: दिलासादायक! 'हा' जिल्हा झाला कोरोनामुक्त; प्रशासनाने केले जाहीर

Next

कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे. अशातच रविवारी एकाच दिवसात देशभरात १ हजार ६१२ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात ५५२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची  रविवारी नोंद झाली. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची ४२०० वर पोहचली आहे.  मात्र एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवेसंदिवस वाढत असताना उस्मानाबाद जिल्हा कोरोनामुक्त झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

उस्मानाबादमध्ये ३ जणांचा कोरोनाची लागण झाली होती. यानंतर या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ८५ लोकांची देखील कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. मात्र या सर्व लोकांचे चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तसेच रविवारी जिल्ह्यातील ३ कोरोनाबाधित रुग्णांचे उपचारानंतरचे शेवटचे अहवाल देखील निगेटिव्ह आल्यामुळे उस्मानाबाद जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. तसेच जिल्हा प्रशासनातर्फे देखील उस्मानाबाद जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. 

दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य मंत्रालयानी दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाबाधितांची संख्या 16 हजारावर गेलीआहे. सध्या देशातील 16 हजार 616 जणांना कोरोनाची लागण झाली असून 519 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 2301 रुग्ण बरे झाले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात एका दिवसात 1334 नविन रुग्ण आढळले आहे.

जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 24,06,823 वर पोहोचली आहे. 1,65,054 लोकांचा मृत्यू झाला आहे. वेबसाइट वल्डोमीटरने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेमध्ये 763,832, स्पेनमध्ये 198,674, इटलीमध्ये 178,972, फ्रान्समध्ये 152,894 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत अमेरिकेमध्ये 40,553, स्पेनमध्ये 20,453, इटलीमध्ये 23,660, फ्रान्समध्ये 19,718, चीनमध्ये 4,632 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Cornavirus: Osmanabad district has been coronavs free mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.