Corona Vaccination: सर्वांना वेळेत लस मिळावी, यासाठी योग्य नियोजन करावे: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 07:05 PM2021-04-28T19:05:17+5:302021-04-28T19:07:54+5:30

Corona Vaccination: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या निर्णयाचे स्वागत करत आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

congress nana patole welcomed decision of maha vikas aghadi govt free corona vaccination | Corona Vaccination: सर्वांना वेळेत लस मिळावी, यासाठी योग्य नियोजन करावे: नाना पटोले

Corona Vaccination: सर्वांना वेळेत लस मिळावी, यासाठी योग्य नियोजन करावे: नाना पटोले

Next
ठळक मुद्देनाना पटोले यांनी केले महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचे स्वागतमोफत कोरोना लसीकरणचे नियोजन योग्य प्रकारे करावे - नाना पटोलेजनतेप्रति आपली बांधिलकी जपली - नाना पटोले

मुंबई:काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मागणी मान्य करून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा घेतलेला निर्णय रास्तच असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या निर्णयाचे स्वागत करत आहे. या वयोगटातील लोकसंख्या पाहता लसीकरण केंद्रावर गर्दी न होता ही मोहीम सुरुळीत पार पडावी, यासाठी योग्य नियोजन करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. (congress nana patole welcomed decision of maha vikas aghadi govt free corona vaccination)

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच खासदार राहुल गांधी यांनी कोरोना प्रतिबंधक लस ही सर्वांना मोफत द्यावी, अशी आग्रही मागणी केली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मोफत लसींसाठी आग्रही भूमिका मांडत पाठपुरावाही केला. कोरोनावर मात करण्यासाठी लस हेच प्रभावी शस्त्र आहे. जगभरातील अनेक देशांत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणात राबविली जात असताना केंद्र सरकार मात्र त्याबाबत चालढकल करत होते. केंद्र सरकारने शेवटी १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला, असे नाना पटोले यांनी सांगितले.

हीच योग्य वेळ! ‘ते’ ट्विट का डिलीट केलं? आदित्य ठाकरेंनी केला खुलासा

जनतेप्रति आपली बांधिलकी जपली

केंद्राने कोरोना लसीकरणाची जबाबदारी मात्र राज्य सरकारवरांवर ढकलून जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. पण महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मात्र सोनिया गांधी यांची मागणी मान्य करून मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आणि जनतेप्रति आपली बांधिलकी जपली आहे, असे पटोले यांनी म्हटले आहे. 

RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक, मगच मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार; ECI चा नवा नियम

नियोजनपूर्वक कार्यक्रम हाती घ्यावा

महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर झालेले असतानाही राज्य सरकारने नियोजनपूर्वक कार्यक्रम हाती घेऊन एकीकडे कोरोनाच्या रुग्णांवर योग्य उपचार तर दुसरीकडे व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेतली. महाराष्ट्राने आतापर्यंत १.५० कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करून देशात आघाडी घेतली आहे. राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे काम करत आहे. दररोज आठ लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. आता केंद्र सरकारने कोणताही दुजाभाव न करता महाराष्ट्राला लसींचा मुबलक पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी, असे नाना पटोले म्हणाले.

“चव्हाणसाहेब, आपण महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीय नेतृत्वाची किंमत मोजत आहोत”

दरम्यान, १८ ते ४४ वयोगटासाठी १ मे पासून लसीकरण सुरूच होणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. येत्या ६ महिन्यात १८ ते ४४ या वयोगटातल्या सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची समिती सूक्ष्म नियोजन करत आहे. लगेच आपल्याला लसीचे डोस उपलब्ध होणार नाहीत. मे अखेरपर्यंत जर लसीचे डोस उपलब्ध होणार असतील, तर त्यांना अचानक एकाच वेळी लसीचे डोस देता येणार नाहीत, असे टोपे यांनी सांगितले. 
 

Web Title: congress nana patole welcomed decision of maha vikas aghadi govt free corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.