औद्योगिक पार्कसाठी सवलतींचा पाऊस, रायगड, औरंगाबादमधील ठिकाणांचा समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 05:56 AM2020-10-30T05:56:45+5:302020-10-30T07:19:16+5:30

केंद्र शासनाच्या रसायन व खते मंत्रालयाने किफायतशीर दरात औषधे उपलब्ध होण्याकरिता बल्क ड्रग हब उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात राज्य शासनाचा सहभाग असेल.

Concessional rains for industrial parks, including places in Raigad, Aurangabad | औद्योगिक पार्कसाठी सवलतींचा पाऊस, रायगड, औरंगाबादमधील ठिकाणांचा समावेश 

औद्योगिक पार्कसाठी सवलतींचा पाऊस, रायगड, औरंगाबादमधील ठिकाणांचा समावेश 

Next

मुंबई : रायगड जिल्ह्यात २ हजार ४४२ कोटींचा बल्क ड्रग (औषधी) हब आणि औरंगाबाद येथे ऑरिक सिटीमध्ये ४२४ कोटींच्या वैद्यकीय उपकरण पार्कसाठी विशेष प्रोत्साहने देण्याचा निर्णय  मंत्रीडळाने घेतला. ही प्रोत्साहने पाच वर्षांसाठी असतील.

एकेंद्र शासनाच्या रसायन व खते मंत्रालयाने किफायतशीर दरात औषधे उपलब्ध होण्याकरिता बल्क ड्रग हब उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात राज्य शासनाचा सहभाग असेल. कूण तीन ड्रग हब उभारले जातील.  औरंगबादच्या ऑरिक सिटीमध्ये चार वैद्यकीय उपकरणे निर्मिती पार्क असतील. बल्क ड्रग हबसाठी मूलभूत सुविधा उभारण्याकरिता जास्तीत जास्त एक हजार कोटी रुपये किंवा एकूण खर्चाच्या ७० टक्के अनुदान दिले जाईल. रायगडच्या हबसाठी मूलभूत सुविधांकरता १०० कोटी रुपये देण्यात येतील.

अशी असतील प्रोत्साहने
 औद्योगिक विकास अनुदान- राज्यात होणाऱ्या प्रथम विक्रीच्या १०० टक्के राज्य, वस्तु व सेवा कर
 विद्युत शुल्क माफी- अनुदान उपभोगण्याच्या कालावधीपर्यंत
 मुद्रांक शुल्क माफी- गुंतवणूक कालावधीतील भूखंड खरेदी, भाडेपट्टा, बँक कर्जासाठी गहाण खत आदी सर्व प्रयोजनार्थ
 विद्युत दर सवलत रु.१.५ प्रति युनिट (१० वर्षांसाठी)
 अनुदान उपभोगण्याचा कालावधी- १० वर्ष
 ही विशेष प्रोत्साहने उद्योगांनी केलेल्या पात्र भांडवली गुंतवणूकीच्या १०० टक्के मर्यादेत राहतील व वार्षिक प्रोत्साहनांची मर्यादा पात्र प्रोत्साहने भागिले अनुदान उपभोगण्याचा कालावधीच्या सरासरीएवढा राहील.
 लघु, लहान व मध्यम घटकांना सामूहिक प्रोत्साहन योजना २०१९ प्रमाणे ५ टक्के व्याजदर सवलत दिली जाईल. 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला सवलती
 सामाईक सुविधा जशा सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा, वाफ, घनव्यवस्थापन इ. सुविधाकरिता १० वर्षाकरिता वीज दरामध्ये रु. २ प्रति युनिट सवलत   वरीलपैकी कोणतीही एक सवलत दिल्यास एमआयडीसीला वार्षिक कमाल ५० अर्थसहाय्य अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या अनुषंगाने सवलत यापैकी जे कमी असेल ती रक्कम १० वर्षांसाठी राज्य शासनाकडून देण्यात येईल.
 

Web Title: Concessional rains for industrial parks, including places in Raigad, Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.