दिलासादायक! नऊ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 07:16 AM2020-09-23T07:16:06+5:302020-09-23T07:16:20+5:30

दिवसभरात ३९२ मृत्यू; १८,३९० नवे बाधित

Comfortable! More than nine lakh patients coronated | दिलासादायक! नऊ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

दिलासादायक! नऊ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सप्टेंबरच्या पंधरवड्यानंतर राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. दिवसभरात २०,२०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर एकूण ९ लाख ३६ हजार ५५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.३६ टक्के आहे. सध्या राज्यात २ लाख ७२ हजार ४१० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


राज्यात मंगळवारी १८,३९० कोरोना रुग्णांची, तर ३९२ मृत्यूंची नोंद झाली. मृत्युदर २.६९ टक्के आहे. बाधितांची एकूण संख्या १२ लाख ४२ हजार ७७० असून, मृतांची संख्या ३३,४०७ आहे. ३९२ मृत्युंमध्ये मुंबई ५०, ठाणे ११, ठाणे मनपा ८, नवी मुंबई मनपा ८, कल्याण-डोंबिवली मनपा ५, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा-भार्इंदर मनपा ६, पालघर २, वसई-विरार मनपा ८, रायगड १७, पनवेल मनपा ४ आदी रुग्णांचा समावेश आहे.
पुण्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली असून, ८१ हजारांहून ती ५९ हजार ७७४ वर पोहोचली आहे.

Web Title: Comfortable! More than nine lakh patients coronated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.